AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशाचा भारताला अत्यंत मोठा धक्का, तारिक रहमान पंतप्रधान होताच भारताविरोधात थेट घेतला हा निर्णय, थेट हवाई…

Bangladesh Air Space Barred : भारत आणि बांगलादेशातील संबंध गेल्या काही वर्षात चांगले राहिले. मात्र, मागील काही महिन्यांपासून हे अधिक तणावात आल्याचे बघायला मिळाले. यादरम्यानच अत्यंत धक्कादायक असा निर्णय बांगलादेशच्या नव्या सरकारने घेतला आहे.

बांगलादेशाचा भारताला अत्यंत मोठा धक्का, तारिक रहमान पंतप्रधान होताच भारताविरोधात थेट घेतला हा निर्णय, थेट हवाई...
Prime Minister Tariq Rahman
| Updated on: Feb 19, 2026 | 4:06 PM
Share

बांगलादेशात मोठे सत्तापरिवर्तन झाले असून तारिक रहमान यांच्या हातात बांगलादेशची सत्ता आहे. बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून काही दिवसांपूर्वीच तारिक रहमान यांनी शपथ घेतली. तारिक रहामान यांच्या हातात बांगलादेशची सत्ता गेल्यानंतर भारत आणि बांगलादेशातील संबंध सुधारतील, असा अंदाज होता. मात्र, तारिक रहमान यांच्याकडून भारताला अत्यंत मोठा धक्का देण्यात आला. तारिक रहमान सरकारने हैराण करणारा आणि अतिशय धक्कादायक असा निर्णय घेतला. भारतीय बजेट एअरलाइन स्पाइसजेटला थेट त्यांच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास बंदी घातली आहे. या निर्णयाने भारतात खळबळ उडाली. यामुळे आता कोलकाता ते गुवाहाटीला जाणाऱ्या काही विमानांचा मार्ग अधिक लांब होईल. मागील काही वर्षांपासून भारत आणि बांगलादेशचे संबंध चांगले राहिले आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून संबंध तणावात दिसत आहेत. त्यामध्येच आता अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आला.

याबाबत स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एअरलाईन नेव्हिगेशन शुल्कासह ऑपरेशनलबाबत या मुद्द्यात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांसोबत सतत संवाद साधत आहोत. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या नियमानुसार आमचे उड्डाण सुरू आहेत.

बांगलादेश सरकारने ही कारवाई फक्त स्पाइसजेटवर केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, थकबाकी न भरल्यामुळे हे पाऊस उचलण्यात आले. थकबाकीचे स्वरूप आणि रक्कम अजून स्पष्ट झाली नाहीये. स्पाइसजेटने सांगितले की, एअरलाइन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. लवकर तोडगा काढण्यावर आमचा भर आहे.

काही स्पाइसजेट फ्लाइट्स बांगलादेशी हवाई क्षेत्र टाळण्यासाठी पर्यायी लांब मार्गांचा वापर करत आहेत. स्पाइसजेटचे शेअर्स जवळपास 1 टक्क्यांनी घसरले आहेत. आता बांगलादेशाची हवाई हद्द वापरण्यापासून स्पाइसजेटला रोखण्यात आलंय. ज्यामुळे त्यांना अधिक फिरून जावे लागणार आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. स्पाइसजेटला सध्याच्या घडीला तरी मोठा भुर्दंड भरावा लागणार हे अगदी स्पष्ट आहे. यासोबतच बांगलादेशाने काही दिवसांपासूनच पाकिस्तानमध्ये आपली विमानसेवा सुरू केलीये.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप