‘सिटी ऑफ ड्रीम्स’ मधून आदिनाथ कोठारेची सरप्राईज एन्ट्री, प्रेक्षकांकडूनहे होतंय कौतुक!

'सिटी ऑफ ड्रीम्सचा' (City of Dreams) पहिला सीझन प्रचंड गाजला होता. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्याचा दुसरा सीझन आला. तोही आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

'सिटी ऑफ ड्रीम्स' मधून आदिनाथ कोठारेची सरप्राईज एन्ट्री, प्रेक्षकांकडूनहे होतंय कौतुक!
आदित्य कोठारे
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 10:15 AM

मुंबई : ‘सिटी ऑफ ड्रीम्सचा’ (City of Dreams) पहिला सीझन प्रचंड गाजला होता. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्याचा दुसरा सीझन आला. तोही आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या एका यातील व्यक्तिरेखेची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे ‘महेश आरवले’ची. ही खास व्यक्तिरेखा आदिनाथ कोठारे याने साकारली असून, त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे.

‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या कोणत्याही पोस्टर, टिझर किंवा ट्रेलरमधून ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आणली गेली नव्हती. ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राईज होते. त्याची ही सामाजिक नेत्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप भावत असून सोशल मीडियावर प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतूनही त्याच्यावर कौतुकांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

‘हे’ सिक्रेट प्रेक्षकांनाही आवडले!

अभिनेता आदिनाथ कोठारे आपल्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ मधील व्यक्तिरेखेविषयी म्हणतो, “सिटी ऑफ ड्रीम्समधील महेश आरवलेची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक गुपित होते. हे गुपित प्रेक्षकांना आवडत आहे. याचा आनंद नक्कीच आहे. अनेकांचे अभिनंदनाचे फोन, मॅसेजेस येत असून सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. प्रेक्षकांच्या आणि सगळ्यांच्या या प्रेमाबद्दल मी खूप आभारी आहे. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे एक प्रकारची ऊर्जा मिळते, तसेच अजून उत्तम काम करण्याचा हुरूप येतो.”

अभिनेता आदिनाथ कोठारे आपल्याला ‘83’, ‘पाणी’, ‘पंचक’ यांसारख्या आगामी चित्रपटांमधून दिसणार आहे. ’83’ हा 1983च्या वर्ल्डकपवर आधारित चित्रपट आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह, दिपीका पदुकोण यांचासोबत आदिनाथही झळकणार आहे. माधुरी दीक्षित निर्मिती ‘पंचक’ या चित्रपटातही आदिनाथ कोठारे दिसणार असून, माधुरी सोबतचा हा त्याचा दुसरा चित्रपट आहे. आदिनाथ दिग्दर्शित ‘पाणी’ या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

कशी आहे कथा?

‘सीरिज सिटी ऑफ ड्रीम्स’ सीझन 1च्या शेवटी, या राजकीय पार्टीची भव्य बैठक पहिली होती. जगदीश दिल्लीसाठी योजना आखतो आणि त्याचा मार्ग मोकळा करून घेतो. दरम्यान, पौर्णिमाला हल्ल्याबद्दल माहिती मिळते. त्यामुळे सीझन 1मध्ये शिल्लक राहिलेली ही कहाणी सीझन 2 मध्येही सुरू राहील. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन 13 मे 2019 रोजी प्रदर्शित झाला.

या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटसोबतच सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, देवस दीक्षित, विकास केणी, संदीप कुलकर्णी असे अनेक दिग्गज मराठी कलाकार झळकले आहेत. मराठी कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ही सीरीज प्रचंड गाजली होती.

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही मालिका नागेश कुन्नूर यांनी दिग्दर्शित केली होती. रोहित बनवलीकर आणि नागेश कुकनूर यांनी सहलेखन केले होते. ही एक राजकीय ड्रामा सीरीज आहे, ज्याच्या आगामी भागाची प्रतीक्षा  प्रेक्षकांना गेल्या वर्षी डिसेंबरपासून होती. पण कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शूटिंग थांबवण्यात आले होते. सीझन 1ला लोकांना चांगला प्रतिसाद मिळाला होता.

हेही वाचा :

किशोर कुमारांची झाली होती 4 लग्न, त्यातील एक आता मिथुन चक्रवर्तींची पत्नी!

‘आणि काय हवं 3’मध्ये जुई आणि साकेतचे नाते होणार अधिकच दृढ, वर्किंग कपल्सला प्रिया बापटचा सल्ला

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.