VIDEO | ‘एक बार चेहरा हटा दें शराबी’ गाण्यावर नवरा-नवरीचा भन्नाट डान्स, वऱ्हाडी हसून बेजार

या व्हिडीओत नवरा विचित्र स्टेप करत आपल्या बायकोसोबत नाचतोय तर नवरी मुलगीही त्याला साथ देतीय. अशा भन्नाट डान्स स्टेप्स तुम्ही कधीच पाहिल्या नसतील.

VIDEO | 'एक बार चेहरा हटा दें शराबी' गाण्यावर नवरा-नवरीचा भन्नाट डान्स, वऱ्हाडी हसून बेजार
नवरा-नवरीचा लग्नात भन्नाट डान्स

लग्न म्हणजे आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस. हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यात सध्या लग्नात वऱ्हाडी मंडळींसोबतच नवरा-नवरींनी डान्स करायचाही ट्रेन्ड आला आहे. वैवाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स करताना दिसतात.

अशाच एका कपल डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. एका लग्नात नवरा-नवरीला नाचण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी इन्स्टाग्राम रिल्सवर सर्वात फेमस असलेल्या ‘एक बार चेहरा हटा दें शराबी’ या गाण्यावर ठेका धरला. पण या नवदाम्पत्याचा डान्स एवढा धम्माल होता की, वऱ्हाडी मंडळी हसून बेजार झाली. (bride groom funny dance video getting viral over social media)

एक बार चेहरा हटा दे शराबी गाण्याचं रिमिक्स व्हर्जन सध्या इन्स्टाग्राम रिल्सवर फार पॉप्युलर आहे. या व्हिडीओत नवरा-नवरीनं लग्नानंतर या गाण्यावर डान्स केला. मात्र, या दोघांच्या स्टेप्स इतक्या मजेशीर आहेत की, रातोरात हा व्हिडीओ व्हायरल झाला. काही जणांनी तर या दोघांना ट्रोलही केलं. या व्हिडीओत नवरा विचित्र स्टेप करत आपल्या बायकोसोबत नाचतोय तर नवरी मुलगीही त्याला साथ देतीय. अशा भन्नाट डान्स स्टेप्स तुम्ही कधीच पाहिल्या नसतील. गंमत म्हणजे मुलीनं रात्रीच्यावेळी चक्क गॉगल घालून डान्स केलाय. यामुळे हे दोघं चांगलेच ट्रोलही झालेत. या दोघांच्या डान्सची नातेवाईकांनी मात्र चांगलीच मजा घेतली.

इन्स्टाग्रामवर या कपल डान्सचा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर तो तुफान व्हायरल झालाय. युझर्स या भन्नाट डान्सला पसंती देत आहेत तर अनेकजण ट्रोलही करत आहेत.

 

 

 

इतर बातम्या :

Viral Video : फ्लाइट अटेंडंटसोबत गैरवर्तन, प्रवाशाला चक्क विमानातच टेप लावून बांधलं

VIDEO : अशी आगळीवेगळी ‘डॉग रेस’ पाहिली काय?; श्वानांच्या रोमांचक खेळाचा व्हिडीओ व्हायरल

Video | दुधाच्या बॉटल्स दिसताच हत्तीच्या पिल्लांना झाला आनंद, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI