Viral Video : कोरोनापासून वाचण्यासाठी ‘ज्ञानी बाबा’चा मंत्र, नेटकरी म्हणतायत महामानवाला पुरस्कार द्या, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: May 27, 2021 | 5:27 PM

सध्या असाच एका देशी नुस्क्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अगदीच मजेशीर आहे. (consuming alcohol ganja corona virus)

Viral Video : कोरोनापासून वाचण्यासाठी ज्ञानी बाबाचा मंत्र, नेटकरी म्हणतायत महामानवाला पुरस्कार द्या, व्हिडीओ व्हायरल
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी वेगवेगळे नुस्के सांगणारे अनेक व्हिडीओ अपलोड केले जात आहेत. व्हिडीओच्या माध्यमातून अनेकजण वेगवेगळे नुस्के सांगत आहेत. सध्या असाच एका देशी नुस्क्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अगदीच मजेशीर आहे. (man claims consuming alcohol wine and ganja will protect us from corona virus video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस कोरोना विषाणूसंदर्भात माहिती देत आहे. मुळात या माहितीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. सहज म्हणून हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचे दिसतेय. या व्हिडीओमधील माणूस मद्यपान केल्याने कोरोनाची लागण होत नाही, असा दावा करतोय. तसेच मद्यामध्ये अल्कोहोल तसेच इतर केमिकल असते. या केमिकलमुळे कोरोना आपल्या जवळ येत नाही. तुम्ही मद्यसेवन करत नसाल तर त्याला जेवणात मिसळून घेतले तरीही कोरोनाची लागण होत नाही, असे व्हिडीओतील व्यक्ती सांगत आहे.

ज्ञानी बाबांची गोष्ट ऐकून नेटकरी हैराण

या ज्ञानी बाबांची गोष्ट ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. जगभरातील वैज्ञानिक कोरोनाला थोपवण्यासाठी औषध तसेच प्रभावी लस शोधत आहेत. मात्र, अजूनही त्यांना यश मिळत नाहीये. मात्र, या ज्ञानी बाबांच्या अजब दाव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. अनेकजण या व्हिडीओला विनोद म्हणून मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

दरम्यान हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ अपलोड करताना ‘यांनासुद्धा ऐका’ असे मजेदार कॅप्शन त्यांनी दिले असून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देणे सुरु केले आहे. एका व्यक्तीने या ज्ञानी बाबांना एखादा पुरस्कार द्यायला हवा अशी मार्मिक टिप्पणी केली आहे. तर असे महामानव कोठे भेटतात ? असा प्रश्नसुद्धा एका नेटकऱ्याने विचारला आहे. या मजेदार व्हिडीओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.

(व्हिडीओमधील व्यक्ती जो दावा करत आहे. त्याचे आम्ही कुठल्याही प्रकारे समर्थन करत नाही.)

इतर बातम्या :

Video: बाप रे! ज्वालामुखीचा असा स्फोट तुम्ही कधीच पाहिला नसेल, लाव्हा तर उसळ्या मारतोय !

Video : तहानलेल्या हरिणाला रानटी कुत्र्यांचा घेराव, शिकारीचा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद

Video | दोन मधमाश्यांची चक्रावून सोडणारी कामगिरी, शीतपेय पिण्यासाठीची धडपड एकदा पाहाच

(man claims consuming alcohol wine and ganja will protect us from corona virus video goes viral on social media)