Video : तहानलेल्या हरिणाला रानटी कुत्र्यांचा घेराव, शिकारीचा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद

या व्हिडीओमधील हरिणाची जगण्यासाठीची थडपड आणि याच हरिणाला मारण्यासाठी कुत्र्यांचे चाललेले प्रयत्न आपल्याला थक्क करुन सोडणारे आहेत. (wild dog attacks deer video)

  • Publish Date - 11:46 pm, Wed, 26 May 21
Video : तहानलेल्या हरिणाला रानटी कुत्र्यांचा घेराव, शिकारीचा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद
wild dog and deer viral video


मुंबई : सोशल मीडियावर प्राणी तसेच पक्ष्यांच्या विविध करामतींचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ हे आपल्याला आनंददायी वाटतात तर काही व्हिडीओंना पाहून आपल्याला नवल वाटते. सोशल मीडिया तसेच यूट्यूबवर प्राण्यांचे असेसुद्धा काही व्हिडीओ अलपोड केले जातात ज्यांना पाहून आपण थक्क होतो. यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या अशाच एका व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. हा व्हिडीओ पाहून हरिणाची जगण्यासाठीची थडपड आणि याच हरिणाला मारण्यासाठी कुत्र्यांचे चाललेले प्रयत्न आपल्याला थक्क करुन सोडणारे आहेत.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एका सरोवरामध्ये एक हरीण अडकल्याचे दिसतेय. पाणी पिण्यासाठी सरोवरावर आल्यानंतर व्हिडीओतील हरिणाला रानटी कुत्र्यांनी घेरलं आहे. याच कारणामुळे हरिणाने थेट सरोवरात उ़डी घेतली आहे. परिणामी हरीण कुत्र्यांच्या तावडीत सापडले आहे.

जगण्यासाठी हरिणाचा संघर्ष

आपण रानटी कुत्र्यांच्या तावडीत सापडलो आहोत, हे समजल्यानंतर व्हिडीओतील हरिणाने थेट सरोवरात उडी घेतली आहे. सरोवरात फसल्यानंतर हरिणाला रानटी कुत्र्यांनी घेरले आहे. कधी एकदाचे हरीण बाहेर येईल आणि कधी त्याचा फडशा पाडू, असे या कुत्र्यांना झाले आहे. त्यासाठी या कुत्र्यांकडूनसुद्धा आटोकाट प्रयत्न केले जात आहेत.

पाहा व्हिडीओ :

शेवटी कुत्र्यांनी हरिणाचा फडशा पाडला

मात्र याच वेळी तळ्यात अडकलेला पाणघोडा हा कुत्र्यांसाठी अडचण ठरत आहे. महाकाय पाणघोड्यामुळे व्हिडीओतील कुत्रे सरोवरात उतरायला घाबरत आहेत. मात्र, काही वेळानंतर पाणघोडा बाजूला झाल्यानंतर कुत्र्यांनी पाण्यात असलेल्या हरिणाला पकडले आहे. कुत्र्यांनी हरिणाला पकडून थेट सरोवराच्या बाहेर फरफटत नेलेले व्हिडीओमध्ये दिसतेय. शेवटी कुत्र्यांनी हरिणाचा फडशा पाडून आपल्या पोटाची सोय केल्याचे दिसतेय.

दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याला Kruger Sightings नावाच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Viral Video: मानवी वस्तीमध्ये शिरला महाकाय सरडा, व्हिडीओ पाहून नेटकरी चकित

Video | दोन मधमाश्यांची चक्रावून सोडणारी कामगिरी, शीतपेय पिण्यासाठीची धडपड एकदा पाहाच

Video : रुग्णांना वाचवण्यासाठी जबरदस्त जुगाड, ‘देशी रुग्णवाहिका’ पाहून तुम्हीही सलाम ठोकाल

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI