Video : रुग्णांना वाचवण्यासाठी जबरदस्त जुगाड, ‘देशी रुग्णवाहिका’ पाहून तुम्हीही सलाम ठोकाल

सध्या अशाच एका जुगाडाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या जुगाडाकडे पाहून अनेकांनी सलाम ठोकला आहे. (odisha homemade ambulance video)

Video : रुग्णांना वाचवण्यासाठी जबरदस्त जुगाड, 'देशी रुग्णवाहिका' पाहून तुम्हीही सलाम ठोकाल
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 5:02 PM

मुंबई : असं म्हणतात की आपल्या देशात टॅलेन्टची कमी नाही. कधी कोण कशाचं जुगाड करेल हे सांगता येत नाही. आपण कधी कल्पनाही केली नसेल अशा प्रकारचे अविष्कार अनेकजण करतात. सध्या अशाच एका जुगाडाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या जुगाडाकडे पाहून अनेकांनी सलाम ठोकला आहे. या देशी युक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Odisha homemade Ambulance video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

आपल्या देशात बुद्धीवंतांची कमी नाही. ओडिशातील अशाच एका बुद्धीवंताने एक मस्त देशी रुग्णवाहिका तयार केली आहे. या रुग्णवाहिकेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

रुग्णवाहिकेचे वैशिष्य काय ?

ओडिशामध्ये दुचाकीच्या मदतीने एका रुग्णवाहिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेमध्ये एका वेळेला एका रुग्णाची ने-आन केली जाऊ शकते. ज्या भागामध्ये रस्ते तसेच दळणवळणाच्या अडचणी आहेत, त्या भगात अशा प्रकारच्या रुग्णवाहिका संजीवनी ठरु शकतात. या रुग्णवाहिकेत एका रुग्णाला झोपता येईल अशा प्रकारे लोखंडी चौकोनी डब्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हा चौकोनी डबा दुचाकीला जोडण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एका महिला रुग्णाला रुग्णालयात नेले जात असल्याचे दिसतेय. एवढंच नाही तर रुग्णवाहिकेवर अॅम्ब्यूलन्स असे लाल रंगात लिहलेलेसुद्धा दिसतेय. तसेच रहदारीतून वाट काढण्यासाठी सायरनसुद्धा बसवण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ :

रुग्णवाहिकेची चांगलीच चर्चा

ओडिशा येथे तयार करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. या जुगाडाचा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी शेअर केला आहे. व्हिडीओसोबत त्यांनी एक मजेदार कॅप्शनसुद्धा दिले आहे. त्यांनी ‘#Feeder_Ambulance, भारताचा अविष्कार,’ असं आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहलं आहे. शर्मा यांनी हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर आतापर्यंत त्याला 16 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची विशेष चर्चा होत आहे.

इतर बातम्या :

Video | भरधाव वेगाने घेतला जीव, अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या अंगावर शहारे

VIDEO | मादीला पटवण्यासाठी तितराचा पिसारा फुलवून डान्स, नेटिझन्स म्हणतात भावा सोड, तिला इंटरेस्ट नाही

Video : भेदक नजर, विजेसारखा वेग, मांजरीने केलेली ‘ही’ शिकार एकदा पाहाच

(Odisha homemade Ambulance video goes viral on social media)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.