Video : भेदक नजर, विजेसारखा वेग, मांजरीने केलेली ‘ही’ शिकार एकदा पाहाच

सध्या मांजरीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (cat and fish viral video)

Video : भेदक नजर, विजेसारखा वेग, मांजरीने केलेली 'ही' शिकार एकदा पाहाच
cat and fish viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील प्राणी तसेच पक्ष्यांचे काही व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या मांजरीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या मांजरीने केलेली शिकार सगळ्यांना आश्चर्यात पाडणारी आहे. (video of Cat who caught Fish from river goes viral on social media)

व्हिडीओ व्हायरल का झाला ?

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ अपलोड होत असले तरी त्यातील मोजक्याच व्हिडीओंना दिवसभर पाहिले जाते. सध्या मांजरीचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चीला जातोय. आपल्या अवतीभोवती अनेक प्राणी असतात. यातील प्रत्येक प्राण्याचे काहीतरी वेगळे वैशिष्य असते. यापैकी मांजरीची तीक्ष्ण नजर आणि तिचा भेदकपणा सर्वांनाच माहिती आहे. मांजरीच्या याच गुणांची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. व्हिडीओमध्ये मांजरीने अतिशय सराईतपणे आपल्या भक्ष्यस्थानी अससेल्या माशाला पकडले आहे. एका क्षणात मांजरीने माशाला चारी मुंड्या चित केलेय. याच कारणामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हिडीओमध्ये एक मांजर नदीच्या काठावर बसलेली दिसत आहे. ही मांजर नदीच्या पाण्यातील माशांवर नजर ठेवून आहे. तिला माशांची शिकार करायची आहे. नदीच्या काठावर शांतपणे बसून व्हिडीओतील मांजर मासे जवळ येण्याची वाट पाहत आहे. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर अचानकपणे एक मासा मांजरीकडे गेल्याचं आपल्याला व्हिडीओतून समजत आहे. हीच संधी साधत काही समजायच्या आत मांजरीने माशाला एक पंजा मारून जखमी केलेय. तसेच पुढच्याच क्षणी मांजरीने आपल्या कठोर जबड्याच्या मदतीने माशाला कैद कले. तिने आपल्या शिकारीला यशस्वीपणे पकडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा सगळा प्रकार पाहण्यासाठी नदीकिनारी लोक जमल्याचे दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Malluae.com (@malluaecom)

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नदीकिनारी जमलेल्या सर्वांनी मांजरीचे कौतूक केले आहे. नेटकऱ्यांनी मांजरीच्या सराईतपणाची वाहवा केली असून अनेकांनी हा व्हिडीओ स्वत:च्या अकाउंटवर शेअर केला आहे. तसेच हा सारा प्रकार पाहून नदीच्या किनारी उपस्थित असलेले नागरिकसुद्धा अवाक् झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | गाढवtv9marathi.com/…/donkey-hugs-little-girl-with-love-emotional-video-goes-viral-on-social-media-463108-मुलीचं अतूट नातं, हंबरडा पाहून नेटकरी भावूक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Facebook Twitter Ban | भारतात फेसबुक, ट्विटर बंद होणार? मग नवा पर्याय काय? पाहा नेटकरी काय म्हणतात?

Viral Video | कोरोनाबाधितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी मेहनत, डॉक्टरांचे ‘हे’ प्रयत्न पाहून तुम्हीही सलाम ठोकाल

(video of Cat who caught Fish from river goes viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI