लाइव्ह TV वर सगळे सूर्यग्रहण पहात होते, तेवढ्यात सुरू झाला ‘नको तो व्हिडीओ’…

सोमवारी ८ एप्रिल रोजी या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण दिसलं. जगाच्या अनेक भागात हे सूर्यग्रहण दिसलं आणि अनेकांनी ते पाहिलं. ज्यांच्याकडे सूर्यग्रहण दिसत नव्हतं त्यांनी नासा तसेच इतर वेबसाइट्सच्या माध्यमातून ते लाइव्ह पाहिलं. अशाच एका लाइव्ह टेलिकास्ट दरम्यान धक्कादायक प्रकार घडला, ज्यामुळे सगळेच प्रेक्षक हैराण झाले.

लाइव्ह TV वर सगळे सूर्यग्रहण पहात होते, तेवढ्यात सुरू झाला ‘नको तो व्हिडीओ'...
Follow us
| Updated on: Apr 10, 2024 | 12:39 PM

सोमवारी ८ एप्रिल रोजी या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण दिसलं. जगाच्या अनेक भागात हे सूर्यग्रहण दिसलं आणि अनेकांनी ते पाहिलं. ज्यांच्याकडे सूर्यग्रहण दिसत नव्हतं त्यांनी नासा तसेच इतर वेबसाइट्सच्या माध्यमातून ते लाइव्ह पाहिलं. संपूर्ण सूर्यग्रहणामुळे सोमवारी उत्तर अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये काही काळ अंधार होता. जगभरातील प्रसारमाध्यमांनीही या खगोलीय घटनेचे संपूर्ण कव्हरेज केले. अशाच एका लाइव्ह टेलिकास्ट दरम्यान धक्कादायक प्रकार घडला, ज्यामुळे सगळेच प्रेक्षक हैराण झाले. सूर्यग्रहणादरम्यान या काळात मेक्सिकन न्यूज आउटलेट आरसीजी मीडियाने केलेली चूक ही मोठी घोडचूक ठरली.

सुरू झाला नको तो व्हिडीओ

खरंतर अनेक ठिकाणी सूर्यग्रहण दिसल्याने बरेचसे लोक टीव्ही चॅनेलवर लाइव्ह टेलिकास्ट बघत होते. अशाच एका चॅनेलवर लोकं ग्रहण पाहत असताना त्या चॅनेलने अचानार एका व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट दिसला. हे नेमकं कोणी केलं आणि का केलं हे सुरूवातीला तर समजू शकलं नाही. पण या कव्हरेजचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्या आउटलेटवर ऑनलाइन माध्यमातून बरीच टीका होत आहे. त्यांना बऱ्याच टीकेला सामोरं जावं लागत आहे. आरसीजी मीडियाच्या 24/7 बातम्यांच्या कार्यक्रमादरम्यान तेथील तीन अँकर हे प्रेक्षकांनी शेअर केलेले सूर्यग्रहणाचे अनेक फुटेज दाखवत होते, तेव्हा अचानक हा अश्लील व्हिडिओ सुरू झाला.

स्थानिक वृत्तपत्रानुसार, असा प्रकार लॅटिन अमेरिकेत अनेकदा घडतो, बऱ्याचदा अशी खोडी काढली जाते. मात्र हीलिप प्रसारित होताच, तेथील दोन महिला अँकरपैकी एक तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त दिसली तर त्यांचा पुरूष सहकारी बातम्या देतच राहिला. ही क्लिप आमच्या प्रेक्षकांकडून शेअर करण्यात आल्याचे त्या अँकरने सांगितलं. लोकांनी शेअर केलेल्या अशा व्हिडीओमुळे आमच्यासाठी अशी लाजिरवाणी परस्थिती उद्भव शकते, असेही त्यांनी नमूद केलं.

याच सर्वांदरम्यान, ‘रिव्हॉल्व्हर’ नावाच्या ट्विटर युजरने या घटनेची जबाबदारी घेतली आहे. मात्र या व्हिडिओमुळे त्या चॅनेलला बऱ्याचा टीकेचा सामना करावा लागत असून लोकं त्यांना खूप काही सुनवत आहेत. एखाद्या दर्शकाने, प्रेक्षकाने व्हिडीओ पाठवला असेल तर तो टेलिकास्ट करण्यापूर्वी रिव्ह्यू करायला हवा, यामध्ये चूक ही चॅनेलची आहे, असं अनेकांनी म्हटलं.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.