AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिमुकल्यानं आईला ओळखलंच..; आतापर्यंतचा Cute video अजिबात miss करू नका

Mother and kid video : एक लहान मूल (Kid) पदराच्या आड बसलेल्या अनेक महिलांमध्ये त्याची आई (Mother) शोधतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावरच्या (Social media) लोकांना खूप आवडतोय. आई आणि मुलाचा हा आतापर्यंतचा सर्वात क्यूट (Cute) व्हिडिओ असल्याचे यूजर्स म्हणत आहेत.

चिमुकल्यानं आईला ओळखलंच..; आतापर्यंतचा Cute video अजिबात miss करू नका
पदर घेतलेल्या महिलांमधून आपल्या आईला ओळखतो चिमुकलाImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 10, 2022 | 10:54 AM
Share

Mother and kid video : अनेकदा काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ हसवणारे आणि गुदगुल्या करणारे असतात, तर काही अतिशय गोंडस आहेत. सध्या असाच एक गोंडस व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. हा व्हिडिओ आई-मुलाशी संबंधित आहे. ज्यामध्ये एक लहान मूल (Kid) पदराच्या आड बसलेल्या अनेक महिलांमध्ये त्याची आई (Mother) शोधतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावरच्या (Social media) लोकांना खूप आवडतोय. आई आणि मुलाचा हा आतापर्यंतचा सर्वात क्यूट (Cute) व्हिडिओ असल्याचे यूजर्स म्हणत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की पिवळी साडी परिधान केलेल्या अनेक महिला पदर घेऊन खोलीत बसल्या आहेत. त्याचवेळी, एक महिला एका लहान मुलासह खोलीत प्रवेश करते. हा मुलगा आपल्या आईला शोधत या खोलीत आला आहे. पण अचानक अनेक महिलांना पाहून तो हैराण झाला. अखेर त्याची आई कोण?

सुरुवातीला गोंधळून जाते, मग…

सुरुवातीला मूल गोंधळून जाते. पण त्यानंतर जे काही घडते ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. मुल पदरातील आईला ओळखते आणि तिच्या मांडीवर बसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहू या…

View this post on Instagram

A post shared by SFT (@status.fan.tranding)

इन्स्टाग्रामवर शेअर

आई-मुलाचा हा क्यूट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर status.fan.tranding नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत 4 लाख 34 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचवेळी, या क्यूटचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

‘असेच असते आई-मुलाचे नाते’

एका यूझरवर कमेंट करताना लिहिले की, सुपर… हा आई-मुलाचा आतापर्यंतचा सर्वात क्यूट व्हिडिओ आहे. त्याचवेळी आणखी एका यूझरने कमेंट करताना लिहिले आहे, की आईचा सुगंधच वेगळा असतो. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरचे म्हणणे आहे, की आई आणि मुलाचे नाते असेच असते. एकूणच या व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत.

आणखी वाचा :

Viral : काय जबरदस्त साधलंय संतुलन! पुन्हा पुन्हा पाहावा असा Stunt video

Viral video : लग्नात सजावटीसाठी ठेवले होते कारंजे, बघा लोकांनी त्याचा उपयोग कसा करून घेतला…

Viral : ‘रासोडे में कौन था’नंतर आता ‘खाली छोरी पटाता है’नं घातलाय धुमाकूळ, 82 लाखांहून जास्त व्ह्यूज; पाहा ‘हा’ Video

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.