मावशींचा “मुर्गा डान्स”! एकदम कडेक, फॅन व्हाल फॅन

आम्हाला इन्स्टाग्रामवर अशी एक क्लिप सापडली आहे जी तुम्हाला खूप खूप हसवेल. एका लग्नाच्या निमित्ताने या मावशी नाचतायत.

मावशींचा मुर्गा डान्स! एकदम कडेक, फॅन व्हाल फॅन
murga dance chicken dance
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 07, 2022 | 3:55 PM

उत्तम डान्स मूव्ह्ज असलेल्या व्हायरल व्हिडीओपासून ते डान्सच्या नावाखाली खूप हसविणाऱ्या लोकांच्या क्लिप्सपर्यंत सोशल मीडियात डान्स व्हिडीओजचा भरणा आहे. फनी डान्स व्हिडिओ! होय, आम्हाला इन्स्टाग्रामवर अशी एक क्लिप सापडली आहे जी तुम्हाला खूप खूप हसवेल. एका लग्नाच्या निमित्ताने या मावशी नाचतायत. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. मित्रांनो या मावशींनी चक्क ‘मुर्गा डान्स’ केलाय.

हा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम युजर maheshdewatwal01 ने 14 नोव्हेंबर रोजी शेअर केला होता, जो आता सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

ही क्लिप शेअर करताना त्या व्यक्तीने लिहिले – चिकन डान्स, चिकन डान्स. कमेंट्समधील डान्स तुम्हाला कसा आवडतो ते सांगा.

खरंतर ही क्लिप एका लग्नसोहळ्याची असून, त्यात महिला आणि मुलं ‘चिकन’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

मात्र, अचानक एक मावशी या गाण्यावर अशी खतरनाक स्टेप्स करू लागते की आसपासची मुलं-मोठी माणसं हसू लागतात! होय, त्यांच्या डान्स स्टेप्स एकदम कोंबडी सारख्या आहेत. हा व्हायरल डान्सचा व्हिडिओ तुम्ही स्वतः पाहिल्यावर तुम्हाला जास्त मजा येईल.

काकूंचा डान्स बघून अनेकांना हसू आवरता आलं नाही! काही युझर्सने लिहिले की, मावशीने धूर केलाय. एका युझरने लिहिले – त्यांना आंटीचा डान्स एक नंबर वाटला, तर कोणी आंटीच्या डान्सला स्ट्राँग म्हटले. आणि हो, काही लोक आंटीच्या ‘मुर्गा डान्स’चे चाहते झाले आहेत.