Duronto Express Viral Video : जेवत असतानाच अचानक फुटला रेल्वेच्या खिडकीचा काच, धाड धाड…दुरंतो एक्स्प्रेसचा थरारक VIDEO पाहून धक्का बसेल!
व्हायरल व्हिडिओमध्ये काही प्रवासी ट्रेनमध्ये जेवण करत असताना अचानक खिडकीची काच फुटली . काचेचे तुकडे प्रवाशांच्या दिशेने आणि त्यांच्या जेवणात पडल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रात्रीच्या वेळी दुरंतो एक्सप्रेस नागपूरहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होती. त्यात प्रवासी निवांत जेवण करत होते… आणि अचानक धाडकन आवाज आला. क्षणात ट्रेनच्या खिडकीची काच फुटली आणि काचेचे तुकडे थेट प्रवाशांच्या अंगावर आणि जेवणात जाऊन पडले. बाहेरून दगड फेकल्यामुळे काच फुटली असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून प्रवाशांमध्ये गोंधळ उडालेला दिसत आहे.
दुरंतो एक्सप्रेसमध्ये नेमकं काय घडलं
25 संप्टेबरच्या रात्री नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला. प्रवासी आपल्या जागेवर बसून जेवण करत असताना अचानक खिडकीवर दगड आदळला आणि काच फुटली.व्हायरल व्हिडिओमध्ये काही प्रवासी खिडकीजवळ बसलेले दिसतात आणि काही क्षणांतच काच फुटून त्याचे तुकडे सगळीकडे पसरले. दगड खिडकीवर आदळल्यानंतर काचेचे तुकडे प्रवाशांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या जेवणात पडल्याचं दिसत आहे. त्यामुळे काही प्रवाशांना जखमा झाल्याचेही या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
View this post on Instagram
घटना रात्रीच्या वेळी घडली
मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे 8.27 वाजता ट्रेनच्या खिडक्यांवर बाहेरून दगड किंवा जड वस्तू आदळल्याचं सांगण्यात आलं. यानंतर रात्री 8.46 वाजता रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपीच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. बोरखेडी- सिंधी परिसरासह जवळच्या भागात तपास करण्यात आला.
व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रवासातील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहे. काही नेटकऱ्यांनी अशा प्रकारे ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच नियमित प्रवास करणाऱ्या काही लोकांनी अशाच प्रकारच्या घटनांचे अनुभव कमेंटमध्ये शेअर केले आहेत.
निवांत ट्रेन प्रवास करत असताना काही सेकंदात घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. दगडफेकीमागे नेमकं कोण होत आणि हा प्रकार कसा घडला, याचा तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.
