न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर चढला गरब्याचा रंग, परदेशात भारतीयांनी केली हवा, Viral Video एकदा पाहाच!
भारतात गरब्याला सुरूवात झाली आहे आणि या गरब्याचा रंग पार अमेरिकेपर्यत पोहोचला आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्स ऑफ स्क्वेअरमध्ये भारतीयांनी फेर धरत गरबा सादर केला. या गरब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण काही यूजर्सनी यावर टिकेची झोड उठवली आहे.

यंदा गरब्याच्या रंग अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये सुद्दधा पाहायला मिळतोय. जिथे मोठ्मोठ्या जाहीरातींचे चमचमणारे स्क्रिन आणि पर्यटकांची गर्दी असते. तिथंच भारतीयांचा रंगीबेरंगी कपडे घालून गरबा रंगला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमणात व्हायरल झाला. परदेशातही भारतीयांचा ठेका पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अनेक जण गोलाकार उभं राहून गरबा खेळताना दिसत आहेत. कुणी तालावर पावलं टाकतंय, तर कुणी पारंपरिक पद्धतीने गोल फिरत नाचतंय. महिलांनी काळ्या रंगांची थीम निवडली आहे आणि घागरे रंगीबेरंगी आहेत . मागे टाइम्स स्क्वेअरचे मोठमोठे स्क्रिन आणि आजूबाजूला थांबून हा नजारा तेथील अमेरिकन लोक पाहताना दिसत आहेत. म्हणजे अमेरिकेच्या गजबजलेल्या चौकात काही वेळासाठी गुजराती गरब्याचा माहोलचं तयार झालायं.
आता हा गरबा पाहून अनेक भारतीयांना आनंद झाला आहे.परदेशात राहूनही आपले सण,परंपरा आणि संस्कृती जपली जाते. हे पाहून काही जणांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. टाइम्स स्क्वेअरसारख्या जगप्रसिद्ध ठिकाणी भारतीय पारंपारिक गरबा सादर होत असल्यामुळे हा व्हिडिओ अनेकांच लक्ष वेधून घेत आहे.
Navratri vibes in New York! 🌺✨
Times Square, NYC turns into a vibrant Garba ground, with music, colors, devotion and the spirit of Maa bringing everyone together. 💃 https://t.co/eMmWl5YXZ3
— Akanksha Parmar (@iAkankshaP) October 12, 2026
हा व्हिडिओ जरी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असला तरी सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेटकऱ्यांनी म्हटलंय अशा प्रकारचा कार्यक्रम करताना तिथल्या इतर लोकांचा विचार करायला हवा. तर काहींनी भारत सोडून परदेशात उत्सव काय साजरा करताय अशी बोचरी टिका देखील केली आहे.
खरं तरं गरबा हा गुजरातमधील पारंपरिक लोकनृत्याचा प्रकार आहे. नवरात्रीच्या काळात देवीची आराधना केली जाते. मोठ्या प्रमाणात गरबा खेळला जातो. भारताबाहेर राहणारे लोकही आपली भारतीय परंपरा बाहेर जपताना दिसतात. त्यामुळे परदेशात गरबा खेळण्याची ही काही पहिली वेळ नाही.
