
सोशल मीडियावर एक मजेशीर फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला किचनमध्ये ठेवलेल्या अनेक गोष्टी दिसतील. पण कोड्यात विचारलेला प्रश्न खूप कठीण आहे. हे कोडे सोडविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण या कोड्याचं योग्य उत्तर शोधण्यात फारच थोड्या लोकांना यश आलंय.
इतक्या साऱ्या वस्तूंनी भरलेल्या किचनच्या आत एक उंदीर लपलेला आहे. हा उंदीर शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 9 सेकंद आहेत.
कोडे सोडवण्यापूर्वी आपल्या मोबाईल फोनवर 9-सेकंदाचा टायमर सेट करायला विसरू नका. हा फोटो सतत पाहिला तर तुम्ही योग्य उत्तर ओळखू शकता.
जर तुम्हाला अजूनही योग्य उत्तर सापडत नसेल, तर आम्ही तुम्हाला तो उंदीर कुठाय ते दाखवतो. योग्य उत्तर फोटोच्या तळाशी लपलेले आहे.
आता आपले सर्व लक्ष स्वयंपाकघरातील ड्रॉवरवर ठेवा आणि आपल्या उत्तराचा अंदाज लावा. जर तुम्हाला तुमच्या उत्तराचा अंदाज आला असेल तर तुमचे उत्तर बरोबर आहे की नाही हे खालील फोटोत पाहा…
Here is the answer
फोटोत दाखवलेल्या किचनकडे नीट निरखून पाहिलं तर किचनच्या ड्रॉवरमध्ये एक छोटा उंदीर दिसेल. या उंदराकडे एक कुकीही आहे जी तो मोठ्या आवडीने खात आहे.
दिलेल्या वेळेत तुम्ही आमची हिंट न वापरता योग्य उत्तर दिलं असेल तर तुमचा मेंदू खरंच थक्क करणारा आहे. मात्र, हे कोडे सोडवण्यासाठी अनेकांना घाम फुटला.