Pakistan Police Viral Video : विदेशी पर्यटकासमोर पाकिस्तानी पोलिसांची फजिती… इंग्रजी प्रश्नाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

पाकिस्तानात फिरण्यासाठी गेलेल्या एका विदेशी पर्यटकाचा पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्यांसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यातील इंग्रजी संवादामुळे नेटकऱ्यांमध्ये हशा पिकला आहे.

Pakistan Police Viral Video :  विदेशी पर्यटकासमोर पाकिस्तानी पोलिसांची फजिती... इंग्रजी प्रश्नाचा व्हिडिओ तुफान व्हायरल
pakistan police viral video
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2026 | 5:50 PM

पाकिस्तान आणि त्यांचे इंग्रजीवरचे प्रेम जगजाहीर आहेच. बापटांच्या म्हणण्याप्रमाणे घटम् भिन्द्यात पटम् चिन्द्यात ही उक्ती जणू पाकिस्तान पोलिसांसाठीच बनली आहे की काय असे या व्हायरल व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे. तोरा मोठा पण बुद्धी….. इंग्रजीचा एवढा साधा प्रश्न पण उत्तर देताना पोलिसांची चांगली तारांबळ उडाली.

पाकिस्तानात फिरायला गेलेल्या एका विदेशी पर्यटकाचा पोलिस अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पर्यटकाने अगदी साध्या इंग्रजीत पोलिस कमांडरला प्रश्न विचारला पण साहेबांना नेमकं विचारलंय तरी काय हेच काही समेजासं झालं. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी पाकिस्तानी पोलिसांची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

नेमक घडलं तरी काय ?

व्हायरल व्हिडिओमध्ये विदेशी पर्यटक चहा पीत असताना काही पाकिस्तानी पोलिस अधिकारी त्याच्याशी संवाद साधताना दिसतात. सुरूवातीला पर्यटक पोलिसांमधील पोलिस कमांडर कोण आहे असा प्रश्न विचारतो. त्यानंतर कमांडरला इंग्रजीत प्रश्न विचारताना दिसत आहे.

अशाच चर्चेमध्ये पर्यटक उत्सुकता म्हणून पोलिसांना प्रश्न विचारत होता. पर्यटकाने इंग्रजीत एक साधा प्रश्न विचारला “चीफ कमांडर म्हणून तु्म्ही किती वर्ष काम करत आहात” पण तो प्रश्न अधिकाऱ्यांना समजला नाही. म्हणून पोलिंसानी हळू बोलण्यास सांगितले तरी प्रश्न कळला नाही. अखेर पूर्ण प्रश्न समजावून विस्कटून सांगितल्यानंतर पाकिस्तानी पोलिसांची ट्युब पेटली.

 

पाकिस्तानी पोलिसांची फजिती

संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पोलिस अधिकारीच असा असेल तर कॉस्टेबलबद्दल विचारायलाच नको, अशी कमेंट एका यूजरने केला आहे. तर एकाने चक्क राजीनाम्याची मागणी केली आहे. विदेशी पर्यटकाचा साधा इंग्रजी प्रश्न समजून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची झालेली धडपड सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांमध्ये हशा पिकला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us