AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हसण्याची संधी सोडू नका, पांडांचा ‘हा’ मजेशीर Viral video miss करू नका!

Cute animal video : सोशल मीडियावर (Social media) काही पांडांचा (Panda) मस्ती करतानाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल. सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील, तसाच हा व्हिडिओही खूपच मजेशीर आहे.

हसण्याची संधी सोडू नका, पांडांचा 'हा' मजेशीर Viral video miss करू नका!
बागेमध्ये मौजमजा करताना पांडाImage Credit source: Twitter
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Mar 03, 2022 | 12:42 PM
Share

Cute animal video : तुम्ही टीव्हीवर पांडा पाहिले असतील, कारण ते भारतात आढळत नाहीत. ते चीनमध्ये आपल्याला दिसतात. परंतु ते इतर अनेक देशांमध्येही नक्कीच दिसतात. जगात आता फारच कमी पांडा उरले आहेत आणि म्हणूनच त्यांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. साधारणपणे पांडा हा जगातील सर्वात आळशी प्राणी मानला जातो, कारण त्यांचा बहुतेक वेळ बसण्यात, खाण्यात आणि झोपण्यात जातो आणि झोपल्यानंतर ते उठतात. मस्ती करतात. मग त्यांना भूक लागली तरच ते उठतात. सध्या सोशल मीडियावर (Social media) काही पांडांचा (Panda) मस्ती करतानाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल. सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील, तसाच हा व्हिडिओही खूपच मजेशीर आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की काही पांडा घसरगुंडीवर मजा करत आहेत.

घसरगुंडीवर मस्ती

एकापाठोपाठ एक घसरगुंडीवरून खाली येतात. मग त्याच वाटेने वर जाण्याचा प्रयत्न करतात, पण दरम्यान त्यांच्यात काहीतरी होते. त्याचवेळी, व्हिडिओमध्ये एक महिला पांडाला वरून खाली ढकलताना आणि त्यांच्याशी मस्ती करताना दिसत आहे. तुम्ही तुमच्या लहानपणी बागेमध्ये अशी मजा केली असेल, हे पांडादेखील तशीच मजा करत आहेत. म्हणूनच ते ही मजा मिस न करता एन्जॉय करत आहेत.

ट्विटरवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ @buitengebieden_ या नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. 34 सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 38 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 10 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पांडाच्या या मजेशीर व्हिडिओचे लोकांनी क्यूट असे वर्णन केले आहे.

आणखी वाचा :

Viral video : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! दोन हरणांची लढाई सुरू असते, तेवढ्यात…

खड्ड्यात पडलेल्या आपल्या शावकांना ‘असं’ वाचवते सिंहिण, Video viral

…जेव्हा शेळीला राग येतो..! पाहा शेळी आणि मोर यांच्यात झाली लढाई, Video viral

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली