AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune IT Engineers : हातात नोकरी तरीही चक्क इंजिनीअरर्स चालवू लागले रॅपिडो, नेमकी भानगड तरी काय?

चांगला पगार असूनही पुण्यातले IT सेक्टरमधील दोन कर्मचारी रॅपिडो चालवण्याच्या फद्यांत पडले आहेत. एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी असताना विकेंडला रॅपिडो चालवण्याची काय गरज असा प्रश्न नेटकरी विचारू लागले आहेत. काय आहे नक्की प्रकरण जाणून घ्या

Pune IT Engineers :  हातात नोकरी तरीही चक्क इंजिनीअरर्स चालवू लागले रॅपिडो, नेमकी भानगड तरी काय?
PUNE RAPIDO DRIVERSImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 20, 2026 | 3:29 PM
Share

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हटलं की चांगला पगार, मोठी कंपनी आणि आरामात आयुष्य असंच चित्र अनेकांच्या डोळ्यासमोर येतं. पण राव, आता पुण्यातील काही इंजिनीअर्सनी कमाईचा असा मार्ग शोधलाय की त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. वर्षाला 12 लाख रूपयांच पॅकेज असतानाही हे इंजिनिअर्स शनिवार – रविवार रॅपिडो चालवतात आणि त्यातून अतिरिक्त पैसे कमावतात. आता एवढा चांगला पगार असताना वीकेंडला बाईक चालवण्याची काय गरज, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

साधारणपणे आठवडाभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर शनिवार – रविवार आला की अनेक जण आराम करतात. मित्रांसोबत फिरायला जातात किंवा एखादा चित्रपट पाहतात. पण या इंजिनिअर्सनी वीकेंडचा उपयोग अतिरिक्त कमाईसाठी करण्याचा पर्याय निवडला आहे.आठवड्यात सॉफ्टवेअर कंपनीत काम करायचं आणि सुट्टीच्या दिवशी रॅपिडोवर बाईक चालवून आणखी पैसे मिळवायचे, असा त्यांचा दिनक्रमच आहे.

12 लाखांचं पॅकेज म्हणजे दर महिन्याला साधारण एक लाख रुपयांचं वार्षिक सरासरी उत्पन्न मात्र प्रत्यक्ष हातात मिळणारा पगार कर, इतर कपाती आणि कंपनीच्या वेतनरचनेनुसार वेगळा असू शकतो.शिवाय आजच्या काळात घरभाडं प्रवास,खाणपिणं आणि इतर खर्चही वाढले आहेत. त्यामुळे काही जण नोकरीसोबत दुसऱ्या उत्पन्नाचा मार्ग शोधत आहेत.

रॅपिडोवर बाईक चालवण्याचा पर्याय निवडल्यामुळे या इंजिनिअर्सल त्यांच्या मोकळ्या वेळेत पैसे कमावण्याची संधी मिळते.अर्थात यातून किती कमाई होते? हे प्रवासाच्या फेऱ्या, मिळणाऱ्या ऑर्डर, काम केलेला वेळ आणि पेट्रोलसारख्या खर्चावर अवलंबून असतं.

या पोस्टमध्ये वापरकर्त्याने सांगितले आहे की, दोन मित्रांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी रॅपिडोसाठी बाईक -टॅक्सी रायडर म्हणून काम केले. दिवसभरात किती कमाई केली हे सर्व राईड्स झाल्यावर शेवटी कळतं. त्याचा स्क्रिनेशॉट त्या मित्राने शेअर केला. एका इंजिनीअरने 900 रूपये कमावले तर दुसऱ्याने 500 रूपये कमावले. मग समजा दिवसाला फार फार 1000 रूपये जरी कमावले तरी महिन्याच्या शेवटी 8000 ते 10000 तुमच्या हातात येतात.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!