अबब! एवढा मोठा अजगर

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोठ्या अजगरासोबत बसलेली दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

अबब! एवढा मोठा अजगर
Big Python
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 10, 2022 | 2:12 PM

एकीकडे सापाला अनेक जण घाबरत असताना दुसरीकडे काही जण इतके जवळ थांबतात सापाच्या की असं वाटतं सापाचे मित्र आहेत. अनेकदा साप अशा लोकांना इजा करत नाहीत. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोठ्या अजगरासोबत बसलेली दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. सर्वात आधी तुम्हीही हा व्हायरल व्हिडिओ अवश्य पाहा…

खरंतर व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने अजगराला मोठ्या प्रेमानं आपल्या मांडीवर बसवलं आहे. त्या माणसाने अजगराचे तोंड धरले आहे. हा व्हिडिओ पाहून कुणाचाही थरकाप उडेल.

साप त्या व्यक्तीवर हल्ला करताना दिसला नाही किंवा त्या व्यक्तीला सापाची भीती वाटत होती असंही .असं वाटतं की, हे दोघंही एकमेकांना आधीच ओळखतात आणि दोघांमध्ये मैत्रीचं नातं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर भरपूर व्ह्यूज मिळत आहेत.

या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पसंती दर्शवली आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले.