RIP Twitter Trending! लोकांनी पार ट्विटरचा जाळ अन् धूर करून टाकलाय, नुसते memes

ट्विटर आपली कार्यालये काही काळासाठी ताबडतोब बंद करत आहे. 21 नोव्हेंबरपासून ट्विटरची कार्यालयं पुन्हा सुरू होतील.

RIP Twitter Trending! लोकांनी पार ट्विटरचा जाळ अन् धूर करून टाकलाय, नुसते memes
RIPTwitter
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 18, 2022 | 3:05 PM

एलन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून ही कंपनी चर्चेत आहे. मस्क सतत त्यात बदल करत असतात. पण कंपनीच्या कर्मचाऱ्यांपासून ते ट्विटर युजर्सपर्यंत मस्क यांनी केलेले हे बदल कुणालाही फारसे पसंत पडत नाहीयेत. मस्क यांनी ब्लू टिकसाठी पैसे भरावे लागणार असल्याची घोषणा केल्यापासून, सेलिब्रिटींनी ट्विटर सोडलंय. मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याबद्दल आणि त्यांना दीर्घ काळासाठी काम करण्यास भाग पाडल्याबद्दल बरीच टीका सुद्धा मस्कवर होत आहे. ट्विटर आपली कार्यालये काही काळासाठी ताबडतोब बंद करत आहे. 21 नोव्हेंबरपासून ट्विटरची कार्यालयं पुन्हा सुरू होतील, असं बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. अशात ट्विटरवर #RIPTwitter ट्रेंड होत आहे, त्यासोबत लोक अनेक मीम्स शेअर करत आहेत. स्वत: मस्क यांनीही एक मीम शेअर केले आहे, ज्यामध्ये तुम्हाला ‘ट्विटरची कबर’ पाहता येईल.