AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘याद आ रहा है तेरा प्यार..’ वाळूशिल्प साकारत Sudarsan Pattnaik यांनी Bappi Lahiri यांना वाहिली श्रद्धांजली

Tribute to Bappi Lahiri : सोशल मीडियावर (Social Media) देशभरातील आणि जगभरातील सर्व चाहते आपापल्या शैलीत त्यांना आदरांजली वाहत आहेत. वाळू कलाकार सुदर्शन पटनायक (Sudarsan Pattnaik) यांनीही 'डिस्को किंग' बप्पी दा यांना अनोखी श्रद्धांजली (Tribute) वाहिली आहे.

Video : 'याद आ रहा है तेरा प्यार..' वाळूशिल्प साकारत Sudarsan Pattnaik यांनी Bappi Lahiri यांना वाहिली श्रद्धांजली
वाळू शिल्प साकारत सुदर्शन पटनायक यांची बप्पी लाहिरींना श्रद्धांजली
| Updated on: Feb 17, 2022 | 11:32 AM
Share

Tribute to Bappi Lahiri : देशातील सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी आता आपल्यात नाहीत. वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर देशभरात शोकाचे वातावरण असून, चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बप्पी लाहिरी अनेक दिवसांपासून आजारी होते. मंगळवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाने ग्रासले होते. मात्र त्यातून ते बरेही झाले होते. मात्र नंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) देशभरातील आणि जगभरातील सर्व चाहते आपापल्या शैलीत त्यांना आदरांजली वाहत आहेत. वाळू कलाकार सुदर्शन पटनायक (Sudarsan Pattnaik) यांनीही ‘डिस्को किंग’ बप्पी दा यांना अनोखी श्रद्धांजली (Tribute) वाहिली आहे. पुरी येथील समुद्र किनाऱ्यावर वाळूत त्यांचा पुतळा कोरून त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.

वाळूच्या पुतळ्याचे चित्र

ओडिशा स्थित वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर बप्पी लाहिरीच्या वाळूच्या पुतळ्याचे चित्र आणि व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या आकस्मिक निधनाने खूप दुःख झाले. यासोबतच त्यांनी बप्पी दा यांच्या याद आ रहा है तेरा प्यार, या लोकप्रिय गाण्याने संदेश दिला.

पसरली शोककळा

बप्पी दा गेल्या वर्षी कोविड पॉझिटिव्ह आढळले होते, परंतु काही दिवसांत ते बरेही झाले होते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. प्रत्येकजण त्यांना स्मरण करीत आहे. बप्पी दा यांना म्युझिक इंडस्ट्रीमध्ये ‘डिस्को किंग’ म्हटले जायचे. बप्पी लाहिरी यांनी डिस्को म्युझिक भारतीय चित्रपटसृष्टीत एका वेगळ्या शैलीने आणले. डिस्को डान्सर, वरदत, नमक हलाल, शराबी, कमांडो यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी हिट ट्रॅक केले होते, जे आजही प्रसिद्ध आहेत.

आणखी वाचा :

दागिन्यांच्या सुरक्षेसाठी होता स्वतंत्र माणूस, बप्पी दांच्या सोन्याचे पुढे काय होणार?

Delhi high court : ही खुर्ची ‘सर’साठी आहे? Justice Rekha Palli यांनी वकिलाला दिला सल्ला; वाचा रंचक वृत्त

Viral : ब्राझीलमध्ये हाहाकार..! अतिवृष्टी आणि भूस्खलनानं विद्ध्वंस, flood video पाहुन अंगावर येईल काटा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.