AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेतल्या मुलांचा हा अतरंगी व्हिडिओ पाहिला का? एवढी मस्ती कुणी केली असेल का? Video viral

Childrens cute video : लहान मुलांचे (Kids) व्हिडिओ हे सर्वचजण आवडीने पाहत असतात. शाळेत असताना आपण विविध खेळ खेळत होतो. अशाच एका भन्नाट खेळाचा शाळेतल्या (School) चिमुकल्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. ही मुले किती अतरंगी असावी, याची कल्पना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येते.

शाळेतल्या मुलांचा हा अतरंगी व्हिडिओ पाहिला का? एवढी मस्ती कुणी केली असेल का? Video viral
शाळेत मस्ती आणि खेळात रमलेले चिमुकलेImage Credit source: Youtube
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Mar 15, 2022 | 8:30 AM
Share

Childrens cute video : लहान मुलांचे (Kids) व्हिडिओ हे सर्वचजण आवडीने पाहत असतात. सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हिडिओ लहान मुलांवरच असल्याचे दिसते. ते आपले मनोरंजनही करतात आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. आजकालच्या मुलांमध्ये टॅलेंट खचाखच भरलेले आहे. त्यामुळे अशा मुलांचे व्हिडिओ (Videos) व्हायरल (Viral) होतात. ते पाहिले की आपल्यालाही असेच काहीसे करावे वाटते. लहानपणीची आठवण आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. शाळेत असताना आपण विविध खेळ खेळत होतो. काही खेळ फारच भन्नाट असतात. अशाच एका भन्नाट खेळाचा शाळेतल्या (School) चिमुकल्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. ही मुले किती अतरंगी असावी, याची कल्पना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

कशाचीही भीती नाही…

व्हिडिओमध्ये पाहू शकता, शाळेत वर्गखोल्यांच्या समोरच्या जागेत काही चिमुकले विद्यार्थी दिसत आहेत. तर वर्गखोल्यांच्या शेजारी जिना दिसत आहे. त्या जिन्यात त्यांच्यापेक्षा वयाने थोडी मोठी असलेली एक-दोन मुले दिसत आहेत. बहुधा आपल्या मोबाइलमध्ये ते या अतरंगी मुलांचे चित्रण करत असावेत. आता या मुलांकडे पाहा. ही चिमुकली पोरं पळत पळत जिन्यातील पायऱ्यांवरून घसरगुंडीसारखे घसरत येत आहेत. त्यांना कशाचीच भीतीही वाटत नसल्याते दिसते. ही सर्व मुले हा खेळ एन्जॉय करत असल्याचे दिसते.

यूट्यूब चॅनेलवर अपलोड

या अतरंगी लहान मुलांचा व्हिडिओ मीडिया मराठी (Media Marathi) या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. नुकताच हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. ‘एवढी मस्ती तर आमच्यात पण नव्हती, शाळेतल्या मुलांचा हा अतरंगी व्हिडिओ पाहून तुम्ही पण थक्क व्हाल’ अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि बालपणाची सफरही घडवेल.

आणखी वाचा :

Arabic Kuthuचा परदेशातही धुराळा; ‘हा’ Super dance पाहून यूझर्स म्हणतायत, भावा, तू बॉलिवूडच्या प्रेमात पडलायस!

Viral : ‘मला खरं प्रेम मिळालं’ म्हणत कोट्यवधीचा मालक करणार 30 वर्ष लहान मुलीशी लग्न!

#Himveers : कबड्डी… कबड्डी… कडाक्याच्या थंडीत ITBP जवानांचा रंगला खेळ, Video viral

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली