Video | 10 सेकंदाचा थरार, छोट्या मुलाचा स्टंट एकदा पाहाच !

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एका छोट्या मुलाचा आहे. मुलगा दिसायला लहान असला तरी त्याने केलेली करामत थक्क करणारी आहे. त्याने एका चार चाकाच्या गाडीवर चांगलाच स्टंट केला आहे.

Video | 10 सेकंदाचा थरार,  छोट्या मुलाचा स्टंट एकदा पाहाच !
bike stunt
| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 5:21 PM

मुंबई : वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करून लोकांचे लक्ष्य वेधण्यासाठी काही लोक मोठा आटापीटा करतात. पर्वत, रस्ते, डोंगर किंवा अशा इतर कोणत्याही ठिकाणावर हे लोक स्टंट करत असतात. सध्या मात्र, अशाच स्टंटबाजीचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक छोटा मुलगा अगदीच थरारक स्टंट करत आहे.

छोट्या मुलाच्या स्टंटची सोशल मीडियावर चर्चा 

आजकालचे युग हे सोशल मीडियाचे आहे. सोशल मीडियावर एकदा प्रसिद्धी मिळाली की अर्थार्जन तसेच प्रसिद्धी अशा दोन्ही गोष्टी आपसूकच येतात. कदाचित याच कारणामुळे तरुण आणि तरुणी सोशल मीडियावर वेगवेगळे प्रयोग करतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एका छोट्या मुलाचा आहे. मुलगा दिसायला लहान असला तरी त्याने केलेली करामत थक्क करणारी आहे. त्याने एका चार चाकाच्या गाडीवर चांगलाच स्टंट केला आहे.

मुलाने नेमका कोणता स्टंट केला ?

व्हिडीओमध्ये एक छोटा मुलगा चारचाकी छोट्या गाडीवर बसला आहे. विशेष म्हणजे तो अतिशय बिनधास्तपणे गाडी चावलत आहे. कशाचीही चिंता न करता तो गाडी चालवत आहे. नंतर फक्त दोनच चाकांवर तो गाडी चालवताना दिसतोय. हा व्हिडीओ फक्त दहा सेकंदांचा असला तरी सध्या त्याची चर्चा होत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळालेली नाही. मात्र त्याला @JukinMedia या ट्विटर अकाऊंटवर पाहता येऊ शकते. या छोट्या मुलाला पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इतर बातम्या :

Video | टिकटॉकवर व्हिडीओ बनवण्याची तरुणीला हौस, पण मध्येच घोळ झाला, नेटकरी हसून लोटपोट

बेबी लायन टामरिनच्या सुटकेचा व्हिडीओ व्हायरल,आई आणि लेकरांचं प्रेम पाहून नेटकरी भावूक

सोशल मीडियावर ‘मंचकिन’ची चर्चा, महिन्याला 3 लाख रुपयांची कमाई, फॉलोअर्सच्या बाबतीत स्टार्सना टक्कर

(small boy doing bike stunt video went viral on social media)