Video | ATM मशीनमधून पैसे बाहेर येताच केला भन्नाट डान्स, तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

सध्या तर एका तरुणीने अजबच कारनामा केला आहे. ती एटीएममधून पैसे काढताना दिलखुलासपणे नाचत आहे. तिचा हा डान्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

Video | ATM मशीनमधून पैसे बाहेर येताच केला भन्नाट डान्स, तरुणीचा व्हिडीओ व्हायरल
ATM DANCE

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण थक्क होऊन जातो. काही व्हिडीओ तर अतिशय खळखळून हसायला लावणारे असतात. तरुण-तरुणी कधी काय करतील हे सांगता येत नाही. सध्या एका तरुणीने अजबच कारनामा केला आहे. ती एटीएममधून पैसे काढताना दिलखुलासपणे नाचत आहे. तिचा हा डान्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

एटीएम मशीमधून पैसे काढताना तरुणीचा भन्नाट डान्स

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ सध्या चांगालाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी दिसत आहे. ती समोर असलेल्या एटीएम मशीनमधून पैसे काढत आहे. बरं ती फक्त पैसेच काढत आहे, असेही नाहीये. ती एटीएम मशीनच्या समोर मजेदार डान्स करत आहेत. हात वर करुन ती ठुमके मारत आहे. तसेच ती अतिशय मजेदार पद्धतीने कंबरसुद्धा हालवत आहे.

मशीनला नमस्कार करुन तरुणी बाहेर पडली

शेवटी एटीएम मशीनमधून पैसे निघाल्यानंतर तिला भलताच आनंद झालाय. मशीनमधून पैसे बाहेर येताच तिने पुन्हा एकदा नाचणे सुरु केले आहे. तसेच शेवटी एटीएमच्या बाहेर पडताना तिने एटीएम मशीला नमस्कारदेखील केला आहे. हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by memes | news | comedy (@ghantaa)

व्हिडीओची सोशल मीडियावर एकच चर्चा

नेटकही हा व्हिडीओ पाहून चांगलेच हसत आहेत. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ त्यांच्या पर्सनल अकाऊटंवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ तुम्हाला इन्स्टाग्रामवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video | न्यूयॉर्कच्या रस्त्यावर किशोर कुमार यांची चर्चा, भारतीय माणसाने गायलं हिंदी गाणं, व्हिडीओ व्हायरल

पोपटाची विद्यार्थ्यांसोबत मैत्री, जवळ जाताच अंगाखांद्यावर खेळतो, अनोख्या दोस्तीची सोशल मीडियावर चर्चा

रात्रीच्या अंधारात हे काय घडलं ! सापाने सशाची चक्क 16 पिल्लं गिळली, सर्पमित्रही अवाक्

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI