AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; दादर चौपाटीवर दृश्यमानता घटली, AQI तब्बल....

Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; दादर चौपाटीवर दृश्यमानता घटली, AQI तब्बल….

| Updated on: Oct 24, 2026 | 10:15 AM
Share

मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असून, दादर चौपाटी परिसरात धुक्याची चादर पसरल्याने दृश्यमानता घटली आहे. वायू प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या मुंबईचा वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) १९८ असून, ही हवा आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे.

मुंबईकरांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली असून, त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या मुंबईचा वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) १९८ नोंदवला गेला आहे, जो आरोग्यासाठी अत्यंत घातक मानला जातो.

दादर चौपाटी परिसरामध्ये सकाळी धुक्याची जाड चादर पसरलेली दिसून आली. या धुरक्यामुळे शहरातील दृश्यमानता मोठ्या प्रमाणावर घटली आहे, ज्यामुळे वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. केवळ दादर चौपाटीच नव्हे, तर मुंबईच्या अनेक भागांमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. वायू प्रदूषणाच्या या वाढत्या पातळीमुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. श्वसनाचे आजार आणि इतर आरोग्यविषयक समस्या वाढू शकतात, अशी भीती आरोग्यतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. मुंबईतील हवेच्या या खराब परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

Published on: Oct 24, 2026 10:15 AM

Follow Us