AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mns on Audio Clip : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या ऑडिओ क्लिपवर मनसेची तर्कसंगत पटणारी स्पष्ट भूमिका

Mns on Audio Clip : मनोज जरांगे पाटील यांनी बाहेर काढलेल्या ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेना-भाजपमधील राजकारण ढवळून निघालं आहे. दोघांमध्ये अविश्वासाचं वातावरण तयार झालं असून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

Mns on Audio Clip : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या ऑडिओ क्लिपवर मनसेची तर्कसंगत पटणारी स्पष्ट भूमिका
Manoj jarange patil-Sandeep Deshpande
| Updated on: Oct 24, 2026 | 11:08 AM
Share

दोन दिवसांपूर्वी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ऑडिओ क्लिप ऐकवली. त्याआधी त्यांनी माझ्या नावाने एकनाथ शिंदे यांनी भाजपंकडून 500 कोटी रुपये घेतले असा आरोप केला होता. तो पुरावा देण्यासाठी म्हणून त्यांनी ही ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. याच ऑडिओमुळे आता शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढाई सुरु झालेली आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संदीप देशपांडे यांनी भूमिका मांडली आहे. “मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप टाकली त्याच्या संदर्भात चर्चा होताना दिसते आहे. याआधी देखील अनेक ऑडिओ क्लिप आल्या त्याचे सार्वजनिक रिपोर्ट आले नाहीत. आता म्हणतात फॉरेन्सिक चौकशी करणार ती कोण करणार याची उत्तर हवी आहेत. तथाकथित नाव समोर येत आहेत ती लोक सत्ताधारी आहेत. ते लोक दुसऱ्या सत्तेत असलेल्या पक्षाबद्दल बोलत आहेत. या सगळ्याची चौकशी सरकारच करणार असेल तर आम्ही विश्वास कसा करायचा?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.

“आतापर्यंत असे कधीच कुठल्या व्हिडिओचे फॉरेन्सिक रिपोर्ट आले नाहीत. याची चौकशी निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली झाली पाहिजे. तरच याची चौकशी निपक्षपाती होणार हे सिद्ध होईल.सगळेच तुमचे आहेत, त्यामुळे आमचा विश्वास नाही. 45 दिवसांच्या टाईम फ्रेम मध्ये रिपोर्ट आलं पाहिजे. कशाप्रकारे विरोधी पक्षाला बदनाम करायचं ही षडयंत्र करत असतात हे प्रामुख्याने बाहेर आलं आहे. जे विरोध करतात, त्यांना आपण प्रोजेक्ट करूया. की हे विकासाच्या विरोधात आहेत. याचा अर्थ हे षडयंत्र आहे. विरोधी पक्षाला संपवण्याचं हे षडयंत्र आहे का?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.

सरकारी लोकांचा दबाव आहे का?

“प्रसिद्ध वृत्तसमूहाची नावे आहेत. यात त्यांची सुद्धा ही जबाबदारी आहे. कुठला तरी लेख छापण्याचा दबाव त्यांच्यावर आला होता का माध्यमांना?. लोकशाहीचा माध्यम प्रमुख स्तंभ आहेत. एवढ्या लूज पद्धतीने वृत्तवाहिनी, वृत्तपत्राबद्दल बोलत असतील तर माध्यमांना पण तुम्ही त्यांच्या दावणीला बांधल का ? त्यामुळे माध्यमांना स्वतःची पारदर्शकता सिद्ध करण्यासाठी त्यांना उत्तर द्यावी लागतील. लोकशाहीच्या स्तंभानी यांचे उत्तर दिले पाहिजे. सरकारी लोकांचा दबाव आहे का?” असं संदीप देशपांडे म्हणाले.

..तर बरच काही बाहेर येईल

“शिवसेनेच्या वॉर रूम मधील संभाषण बाहेर आलं, तर बरच काही बाहेर येईल. लोकशाहीला सुरुंग लावण्याचं ही षडयंत्र आहेत. दोन पक्षाच्या भांडणामध्ये इंटरेस्ट नाही. महायुतीमध्ये बेबनाव आहे की नाही यात आम्हाला इंटरेस्ट नाही. मात्र विरोधी पक्ष नेता संपवण्यासाठी हे करत आहेत का षडयंत्र?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.

Follow Us
500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Jarnage Viral Audio Clip : 500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या..
Pankaj Bhoyar : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या आरोपांमागचं सत्य लवकरच समोर येणार?
तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू...; प्रवीण दरेकरांचा सूचक इशारा
Pravin Darekar On Ramdas Kadam : तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू....; प्रवीण दरेकरांचा रामदास कदमांना सूचक इशारा
मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; AQI तब्बल....
Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; दादर चौपाटीवर दृश्यमानता घटली, AQI तब्बल....
जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल
Mangesh Sasane : मनोज जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल, नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगेंना तुम्हीच मोठं केलं ना, मग आता बाजूला का करता?
Chandrakant Khaire : मनोज जरांगेंना तुम्हीच मोठं केलं ना, मग आता बाजूला का करता? चंद्रकांत खैरेंचा रोख नेमका कोणाकडे?
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?