AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangesh Sasane : मनोज जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल, नेमकं प्रकरण काय?

Mangesh Sasane : मनोज जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Oct 24, 2026 | 10:04 AM
Share

मंगेश ससाणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या निधीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनोज जरांगेला 500 कोटी रुपये देऊन कोणी उभे केले? असा सवाल करत त्यांनी राजकीय कटाचा आरोप केला. जरांगे पाटलांचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात असून, ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असल्याचे ससाणे म्हणाले.

मंगेश ससाणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये देऊन कोणी उभे केले असा थेट सवाल ससाणे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी असा दावा केला की, जरांगे पाटलांनी व्हायरल केलेल्या एका व्हिडिओ क्लिपमधून या कटकारस्थानाचा भाग समोर आला आहे, ज्यात श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना 500 कोटी रुपये दिल्याचे बोलले जात आहे.

ससाणे यांनी जरांगे पाटलांच्या मागील आंदोलनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या लाठीचार्जनंतर रोहित पवार यांची उपस्थिती, राजेश टोपेंच्या कारखान्यातील घडामोडी आणि रात्रीतून हजारो लोकांची जमवाजमव यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या ओबीसी नेत्यांवर टीका करण्यासाठी जरांगे पाटलांना कोणी पैसे दिले, असा सवालही ससाणे यांनी केला. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशी समितीचा अहवाल जाहीर करण्याची मागणी केली, जेणेकरून जरांगे पाटलांच्या मागे कोण आहे हे महाराष्ट्रासमोर येईल. जरांगे पाटील यांचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात असून, ओबीसी आरक्षणाचे नुकसान होत असल्याचा आरोप ससाणे यांनी केला.

Published on: Oct 24, 2026 10:04 AM

Follow Us