Video: जेसीबीच्या फाळक्यात बसून नव दाम्पत्याची वरात, पाकिस्तानच्या जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानातील लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओच चक्क नवरा नवरीची वरात ही ही जेसीबीच्या फाळक्यात बसून काढली गेली आहे.

Video: जेसीबीच्या फाळक्यात बसून नव दाम्पत्याची वरात, पाकिस्तानच्या जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानातील हुंझा व्हॅली परिसरातील हा व्हिडीओ आहे

आपल्याकडे जेसीबीचा वापर खड्डे खोदणे, माती सरकवणे यासह अनेक बांधकाम क्षेत्रातील कामांसाठी केला जातो. निवडणुकीत याच जेसीबीतून गुलालही उधळण्यात आल्याची दृष्यं महाराष्ट्राने पाहिली आहे, पण लग्नात जेसीबी आतापर्यंत कुणीही पाहिला नसेल. पाहिला नसेल, तर आज आम्ही तुम्हाला एक व्हिडीओ दाखवतो आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, जेसीबीचा हा उपयोग आम्हाला माहित नव्हता. पाकिस्तानातील लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओच चक्क नवरा नवरीची वरात ही ही जेसीबीच्या फाळक्यात बसून काढली गेली आहे. ( The bride and groom sit on the bench of the JCB machine.Wedding video in Pakistan goes viral)

पाकिस्तानातील हुंझा व्हॅली परिसरातील हा व्हिडीओ आहे. लग्नानंतर नवरीला घेऊन जाण्यासाठी कुणी आलिशान गाडीचा वापर करतं, कुणी रथ आणतं तर अगदी आपल्याकडचे काहीजण बैलगाडीचाही वापर करतात. पण, पाकिस्तानच्या या पठ्ठ्याने नवरीला नेण्यासाठी थेट जेसीबीच मागवला. जेसीबीला विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलं, आणि त्यावर डीजेही लावण्यात आला, मग नवरा-नवरी कुठं बसणार, तर नवरा नवरीला थेट जेसीबीच्या फाळक्यात उभं करण्यात आलं. अख्ख्या गावातून या जोडप्याची वरात निघाली, वऱ्हाडी मंडळी बाजूला नाचत होती, आणि हे जोडपं अख्ख्या गावाला अभिवादन करत होतं. .

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, यावर एका नेटकऱ्याने लिहलं ‘काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात या महाशयांनी चव घालवली, तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहलं, याला म्हणतात एडव्हेंचर. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी इमोजी वापरुन आपल्या भावना व्यक्त केल्या.

हा मजेदार व्हिडिओ पाकिस्तानी पत्रकार गुलाम अब्बास शाह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ज्याला बातमी लिहिली जाईपर्यंत, हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले होते. आपल्याकडेही असाच एक प्रकार घडला होता, छत्तीसगढच्या कासडोलमध्ये एक महाशय थेट जेसीबीवर बसून नवरीच्या घरी पोहचले होते.

हेही वाचा:

 

Video: ट्रकचालकाचा तोल गेला, कार चालकाने वाचवलं, नेटकऱ्यांकडून कार चालकाचं कौतुक

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफची डुप्लिकेट सापडली, लोक म्हणाले, ‘भाईजान, आतातरी लग्न कर!’

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI