Video: ट्रकचालकाचा तोल गेला, कार चालकाने वाचवलं, नेटकऱ्यांकडून कार चालकाचं कौतुक

तारिक फतेहने त्याच्या कु अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात एक माणूस ट्रकवर उभा दिसतो. तेवढ्यात तो पडतो, आणि त्यावेळी एका कार चालकाने असे काही केले जे तुमचे मन जिंकेल.

Video: ट्रकचालकाचा तोल गेला, कार चालकाने वाचवलं, नेटकऱ्यांकडून कार चालकाचं कौतुक
ट्रकचालकाचा तोल गेला, कार चालकाने वाचवलं


लेखक तारिक फतेह सोशल मीडियावर खूप एक्टीव्ह असतात. जेव्हाही ते कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करतात, ती पोस्ट लगेच व्हायरल होते. ताजं प्रकरण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Koo शी संबंधित आहे. तारिक फतेहने त्याच्या कु अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात एक माणूस ट्रकवर उभा दिसतो. तेवढ्यात तो पडतो, आणि त्यावेळी एका कार चालकाने असे काही केले जे तुमचे मन जिंकेल. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. नेटीझन्सकडून यावर कमेंट्स केल्या जात आहेत. ( columnist-tarek-fatah-shares-a-video-on-koo-goes-viral-truck-driver-car-driver-accident-viral-video )

तारिक फतेहने यांनी कु अकाउंट @Fatah वर व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे की, काही लोकांना असं देखील आवडतं. अवघ्या 24 सेकंदांचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस ट्रकवर उभा आहे. तो तेथून काही वस्तू काढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र, त्याच संतुलन बिघडतं, आणि तो मागच्या बाजूला पडतो. पण, त्याचं नशीब की त्याच्या वेळेत लक्षात येतं आणि तो ट्रकचं फाळकं पकडतो.

पाहा व्हिडीओ:

हा व्यक्ती प्रचंड चपळता दाखवतो आणि स्वतःला पडण्यापासून वाचवतो. पण शरीराच्या वजनामुळे तो ट्रकवर उलटा लटकलेला आहे. या दरम्यानच एक कार त्या दिशेने येताना दिसत आहे. यानंतर कार चालकाने जे काही केले, ते नक्कीच तुमचे मन जिंकेल. कारचालक लटकलेल्या व्यक्तीजवळ थांबतो आणि त्याला उठण्यास मदत करतो.

तारीक फतेह यांच्या या व्हिडीओला शेकडो लाईक्स मिळाले आहे, अनेक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ बघणारे अनेकजण कार चालकाचं कौतुक करताना दिसत आहेत. एका युजरनं कमेंटमध्ये लिहलं, याला ह्युमन स्पिरीट म्हणतात. याशिवाय इतर नेटकऱ्यांनी इमोजीजद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही पाहा:

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफची डुप्लिकेट सापडली, लोक म्हणाले, ‘भाईजान, आतातरी लग्न कर!’

7 वर्षाच्या मुलाकडून वडिलांवरच egg drop challenge, पुढे जे झालं, त्याने लोक पोट धरुन हसले!

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI