Video | न्यूयॉर्कच्या रस्त्यावर किशोर कुमार यांची चर्चा, भारतीय माणसाने गायलं हिंदी गाणं, व्हिडीओ व्हायरल

माझ्यासोबत कोणी गाण्यास तयार आहे का ? असे Reginald म्हणत असल्याचे आपल्याला व्हिडीओमध्ये दिसते. तो सोबत गाण्यासाठी लोकांना विनंती करत आहे. मात्र, कोणाही त्याच्यासोबत गाण्यास तयार होत नाहीये.

Video | न्यूयॉर्कच्या रस्त्यावर किशोर कुमार यांची चर्चा, भारतीय माणसाने गायलं हिंदी गाणं, व्हिडीओ व्हायरल
viral song


मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. येथे कधी एखाद्या तरुणाची करामत चर्चेचा विषय ठरते. तर कधी कोणाची धट्टा-मस्करी सोशल मीडियावर व्हायरल होते. सध्या मात्र एक अतिशय मजेदार आणि आपला मूड फ्रेश करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका भारतीय माणसाने न्यूयॉर्कमध्ये चक्क हिंदी गाणं गायलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

माणूस विचारतोय माझ्यासोबत कोणी गाणे गाणार का ?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. हा व्हिडीओ YouTuber Reginald Guillaume ने शेअर केला आहे. Reginald Guillaume सोबत गौरांग नावाचा एक भारतीय हिंदी गाणे गात आहे. माझ्यासोबत कोणी गाण्यास तयार आहे का ? असे Reginald म्हणत असल्याचे आपल्याला व्हिडीओमध्ये सुरुवातीला दिसते. तो सोबत गाण्यासाठी लोकांना विनंती करत आहे. मात्र, कोणाही त्याच्यासोबत गाण्यास तयार होत नाहीये.

गौरांग म्हणतो मला फक्त हिंदी गाणं गाता येतं

यादरम्यान, गौरांग नावाचा भारतीय त्याच्या समोरुन जात आहे. त्यालासुद्धा Reginald ने माझ्यासोबत गाणं गाशील का असं विचारलंय. सुरुवातीला सॉरी, मी घाईत आहे, असे म्हणत गौरांगने त्याला टाळलं आहे. मात्र नंतर लगेच तो परत आलाय. त्याने नंतर मला फक्त हिंदी गाणे येतात. मला इंग्रजी गाणे येत नाहीत, असं सांगितलंय. विशेष म्हणजे मला फक्त हिंदी गाणे येतात असे गौरांगने सांगितल्यावर Reginald ला चांगलाच आनंद झालाय.

न्यूयॉर्कच्या रस्त्यावर हिंदी गाण्याची चर्चा

त्यानंतर गौरांगने किशोर कुमार यांनी गायलेले दिलबर मेरे हे हिंदी गीत गायले आहे. माईकमध्ये गाताना Reginald ने गौरांगला साथ दिली आहे. गिटार घेऊ Reginald गौरांगसोबत गाणे गात आहे. हा व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. गाणे हिंदी भाषेतील असले तरी Reginald ने त्याला गिटारच्या माध्यमातून उत्तम संगीत दिले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर किशोर कुमार यांनी गायलेल्या गाण्याची चर्चा झाल्यामुळे भारतीय गौरांगचे कौतूक करत आहेत. तसेच काही नेटकरी हा व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर करत असून मजेदार अशा कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ तुम्हाला यूट्यूबवर guitaro5000 या चॅनेवलवर पाहता येईल.

इतर बातम्या :

पोपटाची विद्यार्थ्यांसोबत मैत्री, जवळ जाताच अंगाखांद्यावर खेळतो, अनोख्या दोस्तीची सोशल मीडियावर चर्चा

Video: वयाच्या पंच्याहत्तरीतही काम करण्याचा उत्साह, नागपुरातल्या फाफडेवाल्या आजींनी इंटरनेटवर चर्चा

रात्रीच्या अंधारात हे काय घडलं ! सापाने सशाची चक्क 16 पिल्लं गिळली, सर्पमित्रही अवाक्

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI