Video: वयाच्या पंच्याहत्तरीतही काम करण्याचा उत्साह, नागपुरातल्या फाफडेवाल्या आजींनी इंटरनेटवर चर्चा

75 वर्षांच्या कलावंती दोशींसाठी (Kalawanti Doshi) गुजराती नाश्ताच्या प्रकार असलेला फाफडा बनवणं कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. कलावंती गेली 40 वर्षे फाफडा विकण्याचं काम करत आहेत. वयाच्या या टप्प्यावरही त्याचा फाफडा बनवण्याचा आवेश पाहण्यासारखा आहे.

Video: वयाच्या पंच्याहत्तरीतही काम करण्याचा उत्साह, नागपुरातल्या फाफडेवाल्या आजींनी इंटरनेटवर चर्चा
कलावंती गेली 40 वर्षे फाफडा विकण्याचं काम करत आहेत.

सध्या एका आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या आजीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही तिचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. 75 वर्षांच्या कलावंती दोशींसाठी (Kalawanti Doshi) गुजराती नाश्ताच्या प्रकार असलेला फाफडा बनवणं कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. कलावंती गेली 40 वर्षे फाफडा विकण्याचं काम करत आहेत. वयाच्या या टप्प्यावरही त्याचा फाफडा बनवण्याचा आवेश पाहण्यासारखा आहे. ( inspirational-video-story-of-75-year-old-kalawanti-doshi-selling-fafda-goes-viral-on-internet-Nagpur-fafdewali-dadi )

व्हायरल व्हिडिओमध्ये, आजीची प्रेरणादायी कथा सांगण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी या आजीचं कुटुंब गुजरातमधून नागपुरात स्थलांतरित झालं. त्यातच पतीचा रोजगार गेला, कुटुंबाचं उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न निर्माण झाला. कलावंती सांगतात की, तेव्हा त्यांच्याकडे फक्त 60 रुपये होते, पण दोघांनीही धीर सोडला नाही. त्याने गुजराती नाश्ता फाफडा विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसात ते फक्त 50 रुपये कमवू शकत होते, पण हळूहळू त्यांचं दुकान चालू लागलं आणि आजच्या तारखेला ते लोकांमध्ये ‘फफडावाले’ म्हणून प्रसिद्ध आहेत.

पाहा व्हिडीओ:


कलावंती सांगतात की, तिच्या मुलांनी तिला आता काम थांबवायला सांगितलं आहे, पण असं असूनही तिला काम चालू ठेवायचं आहे. कलावंतीच्या मते, त्या आता 75 वर्षांच्या आहेत, पण आजही तुम्हाला कलावंती हा आठवडाभर 11 ते 7 या ठेल्यावरच सापडतील. कलावंती म्हणतात की, लोक त्यांच्याकडे गरमागरम बनवलेले फफडे खाण्यासाठी येतात, त्यामुळे त्यांना सर्व वेळ उपस्थित राहाणं गरजेचं आहे. शिवाय, कलावंती म्हणतात, मी पैसा कमावते आणि मी स्वत:ची बॉस आहे.

इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, या आजीबाई नागपूरसह संपूर्ण देशात प्रसिद्ध झाल्या आहेत. या वयातही त्या ज्या उत्साहाने काम करतात, तो उत्साह आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरील ह्यूमन्स ऑफ बॉम्बे पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबतच .युजरने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘फफडा जमवानू, काम करवानू, मजानी लाइफ!’ हा व्हिडिओ 45 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

हेही पाहा:

Video: जेसीबीच्या फाळक्यात बसून नव दाम्पत्याची वरात, पाकिस्तानच्या जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल

Video: ट्रकचालकाचा तोल गेला, कार चालकाने वाचवलं, नेटकऱ्यांकडून कार चालकाचं कौतुक

 

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI