AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त या 5 गोष्टी रात्रभर भिजवून ठेवा, सकाळी खा! आरोग्यासाठी आहेत वरदान

असे पदार्थ आपल्याला ऊर्जा तर देतातच, शिवाय अनेक आजारांपासूनही आपले रक्षण करतात. सकाळी ते खाणे फायदेशीर ठरते, म्हणूनच त्यांना सुपरफूड्सचा दर्जाही दिला जातो.

फक्त या 5 गोष्टी रात्रभर भिजवून ठेवा, सकाळी खा! आरोग्यासाठी आहेत वरदान
soaked food
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 21, 2023 | 7:58 PM
Share

मुंबई: आपण अनेकदा रात्रभर भिजवलेल्या गोष्टी खातो, यामुळे सेवन करणे सोपे तर होतेच, पण त्याचे पौष्टिक मूल्यही वाढते. असे पदार्थ आपल्याला ऊर्जा तर देतातच, शिवाय अनेक आजारांपासूनही आपले रक्षण करतात. सकाळी ते खाणे फायदेशीर ठरते, म्हणूनच त्यांना सुपरफूड्सचा दर्जाही दिला जातो. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन म्हणाले की, भिजवलेल्या पदार्थांच्या यादीमध्ये काही शेंगदाणे आणि बियाणे समाविष्ट आहेत जे आपल्याला अनेक समस्यांपासून मुक्त करतात.

मनुका कोरडेही खाल्ले जाऊ शकते, परंतु जर आपण भिजवून सेवन केले तर त्यात लोहाचे प्रमाण वाढेल, ज्यामुळे केस गळणे आणि त्वचेच्या समस्या दूर होतील. हवं तर भिजवल्यानंतर मनुक्याचं पाणीही पिऊ शकता.

असे म्हटले जाते की बदाम खाल्ल्याने मेंदू तेज होतो, परंतु हे वजन कमी करण्यासाठी देखील ओळखले जाते. यात भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते जे कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते, म्हणूनच ते भिजवलेले खाणे फायदेशीर ठरते.

अंजीरमध्ये फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वांची कमतरता नसते, ज्यामुळे त्याला पोषक तत्वांनी समृद्ध फळाचा दर्जा मिळतो. यात पॉलीफेनॉल्स, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे फ्री रॅडिकल्सच्या धोक्यांपासून संरक्षण करतात. वाळलेले अंजीर रात्री पाण्यात भिजवून सकाळी खावे.

फ्लॅक्स बी प्रथिने, फायबर आणि लोह याने समृद्ध असतात जे आपले आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे बियाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी खावे.

मेथीदाणे आपल्याला सांधेदुखीपासून आराम देतात, तसेच ते पोटासाठीही फायदेशीर आहे, त्यामुळे ते खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. यासाठी मेथीदाणे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी त्याचे पाणी प्या.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट