VIDEO : ला ला ला ला हो गई रे…गाण्यावर हटके डान्स करत नवरीची लग्न मंडपात धडाकेबाज एन्ट्री, व्हिडीओ पाहून यूजर झाले थक्क!

सोशल मीडियावर दररोज अनेक मजेदार व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. काही व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचं हास्यावर नियंत्रण राहत नाही. सोशल मीडियावर (Social media) विशेष: लग्नातील (Wedding) व्हिडीओ जास्त प्रमाणात व्हायरल होतात.

VIDEO : ला ला ला ला हो गई रे...गाण्यावर हटके डान्स करत नवरीची लग्न मंडपात धडाकेबाज एन्ट्री, व्हिडीओ पाहून यूजर झाले थक्क!
नवरीची लग्नामधील खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
| Updated on: Mar 04, 2022 | 8:29 AM

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक मजेदार व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. काही व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचं हास्यावर नियंत्रण राहत नाही. सोशल मीडियावर (Social media) विशेष: लग्नातील (Wedding) व्हिडीओ जास्त प्रमाणात व्हायरल होतात, लग्नातील व्हिडीओ युजर्सना बघायला देखील प्रचंड आवडतात. सध्या असाच एक खास लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.

नवरीची लग्न मंडपात धडाकेबाज एन्ट्री

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, लग्न मंडपामध्ये नवरीने धडाकेबाज एन्ट्री घेतली आहे. बर्‍याचदा पूर्वीच्या नवऱ्या लाजत लग्न मंडपामध्ये यायच्या. मात्र आता तो काळ पुर्णपणे बदलला आहे. आताच्या नवऱ्या बुलेट चालवत, खास डान्स वगैरे करत लग्न मंडपामध्ये खास एन्ट्री घेतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरीने सुंदर ड्रेस आणि ‘लव आज कल’ चित्रपटातील ‘ला ला ला ला हो गई रे’ या गाण्यावर डान्स करते आहे.

पाहा व्हायरल नवरीचा व्हायरल झालेला व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर ‘weddings fever’ नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. एका यूजरने लिहिले की, त्याने नवरीची अशी एन्ट्री पहिल्यांदाच पाहिली आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ काही सेकंदांचा आहे, मात्र तो खूप पसंत केला जात आहे. यावर भरपूर कमेंट करण्यासोबतच लोक सोशल मीडियावरही ते जोरदार शेअर करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 1800 लोकांनी पाहिला आहे. नवरीची एन्ट्री आणि तिची बोल्ड स्टाइल लोकांना पसंत पडत आहे.

संबंधित बातम्या : 

Video : ‘टपरीवाला असला तरी चालेल पण निर्व्यसनी हवा, माझी पोरगी सुखी राहील’, Indurikar महाराजांचं कीर्तन Viral

हिरव्या रंगाचं कुत्र्याचं पिल्लू कधी पाहिलंय का? Photos तर होतायत Viral; वाचा, नेमकं काय आहे प्रकरण?