Video : ‘टपरीवाला असला तरी चालेल पण निर्व्यसनी हवा, माझी पोरगी सुखी राहील’, Indurikar महाराजांचं कीर्तन Viral

प्रदीप गरड

Updated on: Mar 04, 2022 | 7:30 AM

Comedy kirtan marathi : सोशल मीडियावर विनोदी व्हिडिओ सर्वात जास्त आवडीनं पाहिले जातात. माहितीपूर्ण पण विनोदी (Comedy) अंगानं असणारे व्हिडिओही अनेकजण पाहतात. त्यातलेच व्हिडिओ (Video) आहेत निवृत्तीमहाराज देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांचे...

Video : 'टपरीवाला असला तरी चालेल पण निर्व्यसनी हवा, माझी पोरगी सुखी राहील', Indurikar महाराजांचं कीर्तन Viral
कीर्तनकार ह. भ. प. निवृत्तीमहाराज देशमुख
Image Credit source: Youtube

Comedy kirtan marathi : सोशल मीडियावर विनोदी व्हिडिओ सर्वात जास्त आवडीनं पाहिले जातात. यात छोट्या मुलांचे व्हिडिओ तसेच प्राण्यांचे व्हिडिओ यांचा समावेश होते. ते असं काहीतरी करतात, की आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला आवडतं. त्याचबरोबर माहितीपूर्ण पण विनोदी (Comedy) अंगानं असणारे व्हिडिओही अनेकजण पाहतात. त्यातलेच व्हिडिओ (Video) आहेत निवृत्तीमहाराज देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांचे… सध्या त्यांचं एक कीर्तन व्हायरल होतंय. यात तरुणांना ते संदेश देत आहेत. सतरंज्या झटकून जगण्यापेक्षा म्हशी सांभाळून जगा. कुण्याच्याही मागे जाऊ नका. विशेषत: राजकारण्यांच्या मागे.. ते तुम्हाला सिझनपर्यंत सांभाळतील, आम्ही तुम्हाला कावळा शिवेपर्यंत सांभाळू, असं ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांच्या विनोदी शैलीत कीर्तन करून उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

‘व्यसनं करू नका’

कीर्तनात महाराज म्हणाले, की राजकारणात शंभरातले पाचच लोक यशस्वी होतात. बाकीचे सतरंज्या झटकून मेले. काय फायदा? हे बुटाचं पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुटं चाटून जगणारं रक्त नाही, असंही ते म्हणाले. तरुणांनो व्यवसाय करा, आता बायका मिळणं अवघड झालंय. पहिला जमाना राहिला नाही. 20 एकर जमीन आहे, म्हणून तुम्हाला कोणी पोरगी देणार नाही. व्यसनं सोडा तरच तुमचं भलं आहे, असा संदेश यानिमित्तानं त्यांनी दिला.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर मराठी सुपरस्टार (MaRaThi Superstar) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 24 नोव्हेंबरलला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या चॅनेलवर इंदुरीकर महाराजांचे विविध संदेशपूर्ण व्हिडिओ अपलोड केले जातात. यूझर्सही ते आवडीने पाहतात. व्हिडिओ जुना असला तरी आता तो व्हायरल होतोय. ‘खोडीचे पाहुणे ! इंदुरिकर महाराज कॉमेडी किर्तन! Nivrutti maharaj comedy kirtan‘ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. व्हिडिओला लाइक्स तर आहेतच शिवाय कमेंट्स करून यूझर्स प्रतिसाद देत आहेत. (Video courtesy – MaRaThi Superstar)

आणखी वाचा :

#WorldWildlifeDay : काँग्रेसच्या Indira Gandhi यांच्या फोटोनंतर भाजपानं Share केला ‘हा’ Photo, सोशल मीडियावर चर्चा

हसण्याची संधी सोडू नका, पांडांचा ‘हा’ मजेशीर Viral video miss करू नका!

Viral video : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! दोन हरणांची लढाई सुरू असते, तेवढ्यात…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI