Video : दिलदार मनाचा बॉस! बोनसच्या रुपात इतके पैसे दिले की…नोटांचे बंडल पाहून सगळेच थक्क; व्हिडीओ पाहाच!
दिवाळी आली की नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला बोनसची उत्सुकता असते. कुणाला मिठाईचा बॉक्स मिळतो, तर कुणाच्या हातात गिफ्ट. पण सूरतमधल्या एका कापड व्यापाऱ्याने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस दिलाय की त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

दिवाळी आली की नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला बोनसची उत्सुकता असते. कुणाला मिठाईचा बॉक्स मिळतो, तर कुणाच्या हातात गिफ्ट. पण सूरतमधल्या एका कापड व्यापाऱ्याने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस दिलाय की त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. कारण या व्यापाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांना एक दोन हजार नाही, तर प्रत्येकी एक लाखांहून अधिक रक्कम दिली आहे.
गुजरातमधील सूरतच्या मोटा वराछा परिसरातील सुदामा चौकात हे महादेव व्लॉथ सेंटर आहे. याच दुकानाचे मालक रामस्वरूप मुंडे यांनी यंदाच्या दिवाळीत आपल्या 20 कर्मचाऱ्यांनी खास भेट देण्याचं ठरवलं. त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला 1 लाखांहून अधिक रक्कम बोनस म्हणून दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मालकाचे पाय धरले आहेत. तसेच महिलांना रडू कोसळले आहे.
आणि हा बोनस देण्याची पद्धतही तितकीच खास होती. त्यांनी पूजा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ताटांमध्ये 10,20,50,100,200 500 रूपयांच्या नोटांच्या गड्ड्या सजवल्या. काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीच्या हातून बोनस देण्यात आला.
समोर नोटांनी भरलेलं ताटं आल्यावर कर्मचाऱ्यांना काही क्षण विश्वासच बसला नाही. वर्षभर केलेल्या मेहनतीचं असं मोठं बक्षीस मिळाल्याने अनेक कर्मचारी भावूक झाले. काही कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले तर काहींनी त्यांचे आशीर्वादही घेतले.
मालकाच्या म्हणण्यांनुसार, दुकानात काम करणारे लोक केवळ कर्मचारी नसून त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत. वर्षभर त्यांच्या मेहनतीमुळे व्यवसाय पुढे जातो. त्यामुळे दिवाळीसारख्या सणाला त्यांच्या घरात पैशांची कमतरता भासू नये आणि त्यांनाही आपल्या कुटुंबासोबत आनंदाने सण साजरा करता यावा, या विचारीतून त्यांनी हा बोनस दिला.
कर्मचाऱ्यांना नोटांनी भरलेली ताटं देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजणल व्यापाऱ्याचं कौतुक करत आहेत. काही जणांनी तर अशा मालकाकडे नोकरी मिळाली तर किती छान होईल अशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत.