आहेरात वधूने आणला होता बेड, दिवसरात्र तेथेच घुटमळायची,आत डोकावताच झाला घटस्फोट !

सोशल मीडियावर एक प्रचंड धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे प्रकरण नक्की कुठले आहे ही माहिती देण्यात आलेली नाही. या व्हिडीओची खूपच चर्चा सुरु असून खास करुन लग्न करु इच्छीणाऱ्या तरुणांमध्ये दहशत पसरली आहे.

आहेरात वधूने आणला होता बेड, दिवसरात्र तेथेच घुटमळायची,आत डोकावताच झाला घटस्फोट !
file photo
| Updated on: Sep 25, 2025 | 6:43 PM

सोशल मीडियात रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही वेळा अशा व्हिडीओतून समाजातील काळे वास्तव समोर येते. अलिकडे इंस्टाग्रामवर एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने इंस्टाग्रामवर हंगामा झाला आहे. या व्हिडिओ पासून लग्न करु इच्छीणाऱ्या तरुणांचे धाबे दणादणले आहेत. काय आहे या व्हिडीओत हे पाहून सर्वांना धक्का बसला आहे.

सोशल मीडियात काही वेळा मनोरंजन करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. परंतू काही वेळा असे व्हिडीओ व्हायरल होतात. त्यामुळे अनेक समजूतींना धक्का बसतो. आणि समाजाची एक काळी बाजू देखील समोर येत असते. या व्हिडीओत पाहाता येईल की एका नववधूला लग्नात हुंडा म्हणून लाकडी पलंग मिळाला होता. ती पलंगाला कोणाला हात लावू देत नव्हती नेहमी स्वत:च चादर बदलायची आणि स्वत: त्यावर बसून असायची परंतू एक दिवस हे कटू सत्य उघड झाले.

नववधूला लग्नात आहेर म्हणून मिळालेल्या पलंगात एवढे काय आहे म्हणून या नववधूचा पती हट्टाला पेटला आणि एके दिवशी पत्नीची नजर चुकवून त्याने या पलंगाचे स्टोअरेज उघडले. तर त्याच्या सह सासरच्या मंडळींना प्रचंड धक्का बसला.

या व्हिडीओला @silent_boy_ap_dhakad_602 अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. याच्या कॅप्शनमध्ये लग्नात मिळालेल्या बेडमधून बॉयफ्रेंड निघाला ! या व्हिडीओला काही तासात लाखो व्यूज मिळाले आहेत. नेटीझनने या व्हिडीओवर विविध स्वरुपाच्या प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत. व्हिडीओतील काय दाखवले आहे ? लग्नानंतर सासरी आलेली नववधू या बेडटे सेटअप करत होती. त्यावेळी नेमका पती आणि तिच्या सासरची मंडळी बेडरुममध्ये घुसले. त्यामुळे वधूचा चेहरा पडला आणि ती प्रचंड घाबरली. त्यानंतर बेडच्या चादरी हटवल्या जातात. आणि बेडचा स्टोअरेज उघडला जातो. तेव्हा त्यातून एक व्यक्ती बाहेर पडतो, तो म्हणजे वधूचा बॉयफ्रेंड..!

येथे पाहा व्हिडीओ –

लग्न करणाऱ्यांमध्ये दहशत

जेव्हा बेडरुममधून काही संशयास्पद आवाज आला तेव्हा सर्व वधूच्या रुममध्ये आले. त्यावेळी वधू एकटीच होते. परंतू पतीला संशय होता,त्यामुळे त्याने नीट तपासणी सुरु केली, त्यानंतर हा बेड उघडण्यात आला. तेव्हा आत एकजण लपला होता. हा तरुण या वधूचा प्रियकर होता. त्यानंतर या प्रियकरांची सासरच्या मंडळींना येथेच्छ धुलाई केली. यावेळी प्रियकर अक्षरश: माफी मागू लागला आणि चेहरा लपवण्याचा प्रयत्न करु लागला.