AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 रुपये वाला बिस्कुट कितने का है जी…रिल्ससाठी दुबईची नोकरी सोडणारे शादाब जकाती होताहेत व्हायरल

10 रुपये वाला बिस्कुट कितने का है जी..या डायलॉगने जगाला हसवणारे शादाब जकाती यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी रिल्ससाठी दुबईतील नोकरी सोडली...आता कसे जगताहेत वाचा

10 रुपये वाला बिस्कुट कितने का है जी...रिल्ससाठी दुबईची नोकरी सोडणारे शादाब जकाती होताहेत व्हायरल
Shadab Jakati
| Updated on: Sep 24, 2025 | 5:19 PM
Share

’10 रुपये वाला बिस्कुट का पॅकेट कितने का है जी’…असे दुकानदाराला विचारत त्याचे डोके भंडावून सोडणारा मेरठचे रहिवाशी शादाब जकाती यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रसिद्ध गायक बादशाह यानेही या डायलॉगवर आपला एक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.जो खूप व्हायरल होत आहे.

क्रिकेटर रिंकू सिंह याने या ट्रेंडला फॉलो करत आपला व्हिडीओ शेअर केला आहे. याशिवाय अनेक सेलिब्रिटी देखील या ट्रेंडला फॉलो करीत रिल्स बनवत आहेत. त्यामुळे मेरठचे छोटे गाव इंचौलीचे राहणारे शादाब जकाती आज कल खूप चर्चेत आले आहेत. युपी टक चॅनलने शादाब याची खास मुलाखत घेतली आहे. त्यात त्याने आपला प्रवास सांगितला आहे.

व्हायरल व्हिडीओत काय आहे ?

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की शादाब एका किराणा स्टोअरमध्ये जाऊन विचारतात की ’10 रुपये वाला बिस्कुट का पैकेट कितने का है जी’ या प्रश्नानंतर दुकानदार संतापतो. शादाब त्यांच्या व्हिडीओत त्यांच्या पायाने थोडे वाकत चालण्याची विशेष ढब आणि त्यांची डायलॉग डिलिव्हरीने प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत. शादाब यांची बोलण्याची स्टाईल सोशल मीडियावर फॉलो केली जात आहे. शादाब यांना सोशल मीडियावर चांगलेच फॉलोअर आहेत.

आपला प्रवास सांगताना भावूक झाले

शादाब मेरठच्या इंचौली गावातून ड्रायव्हरच्या नोकरीसाठी सौदी अरबला गेले होते. तेथे त्यांना रिल्स बनवण्याची कल्पना सुचली. परंतू तेथे त्यांना कोणी सपोर्ट केला नाही. कुटुंबानेही सपोर्ट केला नाही. लोक त्यांची थट्टा करायचे. विविध पद्धतीने बोलायचे. सहकारी हसायचे आपली कथा सांगताना शादाब भावूक झाले.

रिल्स बनवण्यासाठी सौदीची नोकरी सोडली

शादाब यांनी गायक बादशाह याचे आभार मानले आहेत. त्याच्यामुळे मला इतकी प्रसिद्धी मिळाल्याचे ते नमूद करतात. एके काळी आपण आर्थिक संकटात होतो. परंतू हिंमत हरली नाही. व्हिडीओ बनवल्याने त्यांना सौदीची नोकरी सोडावी लागली. कारण त्यांच्या व्हिडीओवर तेथे बंदी घातली गेली. परंतू त्यांनी नोकरी सोडत पुन्हा भारतात येऊन रिल्स बनवण्यास सुरुवात केली. आता ते प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत.शादाब मेरठच्या इंचौली गावातील छोट्या घरात रहातात.आता शादाबला भेटायला मोठ्या संख्येने लोक येतात. परंतू त्यांचे म्हणणे आहे की ते साध्या माणसासारखेच राहतात.

येथे पाहा व्हिडीओ –

स्लिप डिस्कने शादाबची चाल बदलली

शादाब यांना स्लिप डिस्कचा आजार आहे. ज्यामुळे त्यांचे चाल बदलली आणि त्यांना लंगडत चालावे लागते.परंतू त्यांचे हे कंबरेत वाकत चालणेही चाहत्यांना त्यांची स्टाईल वाटत आहे. त्यांचे म्हणणे आहे त्यांना अनेक जाहीरातीच्या ऑफर देखील आल्या आहेत. चित्रपटाच्याही ऑफर आल्या आहेत. ते म्हणतात त्यांना चित्रपटात काम करण्याची आवड नाही. आपण रिल्समध्येच समाधानी आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...