Hair Color Video: केसांना कलर करताय मग हा व्हायरल व्हिडीओ पाहा, महिलेची अवस्था पाहून अनेकांनी…

केसांचा कलर करून घेण्यासाठी गेलेल्या मुलीचे केस गळाले, डोक्याला सुटली खाज; डोके धुतल्यावर पाहा कशी दिसते महिला...

Hair Color Video: केसांना कलर करताय मग हा व्हायरल व्हिडीओ पाहा, महिलेची अवस्था पाहून अनेकांनी...
Hair Color Video
Image Credit source: twitter
| Updated on: Dec 23, 2022 | 10:39 AM

मुंबई : अधिक सुंदर दिसण्यासाठी महिला केसांना (Hair) नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचे कलर (Color) लावत असतात. विशेष म्हणजे एखाद्या कार्यक्रमात महिलांना जायचं असल्यास चांगल्या सलूनमध्ये जाऊन केसांना कलर करतात. एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका महिलेच्या केसांना कलर लावण्यात आला आहे. त्यानंतर हेयर आर्टिस्ट आणि तिथल्या कामगारांची धांदल उडाली.

ज्यावेळी त्या महिलेच्या डोक्याला कलरचं रसायन लावलं. त्यानंतर काहीवेळेने महिलेचं डोकं जळाल्यासारख तिला भासू लागलं. महिलेचा आरडा ओरडा केल्यानंतर सलून मधील स्टाप इकडे तिकडे धावू लागला, केसांना लावलेलं रसायनं काढण्याचा प्रयत्न तिथल्या कर्मचाऱ्यांनी केला. त्यावेळी महिलेची डायरेक्ट केस हातात येऊ लागली. त्या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.

नेमकं काय झालं

सुरुवातीला त्या महिलेच्या केसांना पुर्वीचा कलर होता. तिने त्यावर नवा कलर लावण्याचं सलूनमध्ये सांगितलं. त्यानंतर तिथल्या हेयर आर्टिस्टने त्या कलरचं रसायन तयार केलं आणि तिच्या केसांना लावलं. त्यानंतर महिलेच्या डोक्यात तिला जळल्यासारखं वाटू लागलं. तिला ते सहन होत नसल्यामुळे ती ओरडू लागली. हेयर आर्टिस्टने केस धुण्यासाठी घेतले, परंतु केस इतके तुटू लागले की, सलून एकदम गंभीर झालं. केस पुर्ण धुवून झाल्यानंतर त्या महिलेचे केस पुर्णपणे पांढरे झाले होते. त्या महिलेच्या केसाचं अधिक नुकसान झालं आहे. तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवरती अधिक व्हायरल झाला आहे.