VIDEO : वादळ आलं अन्… सब कुछ उड गया… नाही नाही… फक्त केसच उडाले, पाहा काय फजिती झाली या माणसाची?

दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल  (Viral Video)  होतात. मात्र, युजर्सला पोट धरून हसवणारे व्हिडीओ बघायला अधिक प्रमाणात आवडते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडिवर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

VIDEO : वादळ आलं अन्... सब कुछ उड गया... नाही नाही... फक्त केसच उडाले, पाहा काय फजिती झाली या माणसाची?
जोरदार वारे आले आणि एका व्यक्तीचे केस उडून गेले
| Updated on: Feb 22, 2022 | 11:59 AM

मुंबई : दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल  (Viral Video)  होतात. मात्र, युजर्सला पोट धरून हसवणारे व्हिडीओ बघायला अधिक प्रमाणात आवडते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडिवर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ (Video)  जर तुम्ही बघितला तर हा व्हिडीओ बघितल्यावर हसून हसून तुमच्या डोळ्यांमधून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे या व्हिडीओची सोशल मीडियावर (social media) खूप चर्चा आहे.

जोरदार वारे आले आणि मानसाचे केस उडाले!

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, खूप मोठे वादळ अचानक येते. यामुळे झाडांची पाने आणि धूळ सगळीकडे होते. याचदरम्यान या वादळामध्ये एक व्यक्ती उभी आहे. या वादळामुळे या व्यक्तीच्या डोक्यावर असलेले विग देखील वाऱ्यासोबत उठून जाते. ही सर्व घटना तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड होते. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धूमाकुळ घातलो आहे. नक्कीच हा व्हिडीओ तुम्ही बघितल्यावर तुम्ही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.

इथे पाहा तो वाऱ्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ इंग्लंडच्या बर्नस्टेपल शहराचा आहे, जिथे शुक्रवारी जोरदार वारे आले होते. ज्या व्यक्तीचे विग वाऱ्यामध्ये उडून गेले आहे, त्या व्यक्तीचे नाव सायमन विल्क्स आहे. ते एका कार पार्कमध्ये उभे होते, यादरम्यान वारे जोरदार आले आणि त्यांचे विग उडून गेले. हा मजेदार व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘या व्यक्तीसाठी हवेपेक्षा केस महत्त्वाचे आहेत.’

संंबंधित बातम्या :

VIDEO : देव तारी त्याला कोण मारी…! रस्त्यावर धावणाऱ्या लेकराला मृत्यू चाटून गेला, एक सेकंदाचा उशीर आणि…

‘माणसानं माणसाशी माणुसकीनं वागलं पाहिजे’, ‘हे’ तीन मित्र कसा देतायत संदेश? पाहा Video