AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : देव तारी त्याला कोण मारी…! रस्त्यावर धावणाऱ्या लेकराला मृत्यू चाटून गेला, एक सेकंदाचा उशीर आणि…

असं म्हणतात ना...मुले ही देवा घरीची फुले असतात आणि देव स्वत: मुलांचे रक्षण करत असतात. याचा एक प्रत्यय आला आहे. जेव्हा एका लहान मुलाचा मृत्यू (Death) त्याच्या अगदी जवळ आला आणि त्याला स्पर्श करून निघून गेला. सध्या सोशल मीडियावर एक खतरनाक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Terrifying video)  होताना दिसत आहे.

VIDEO : देव तारी त्याला कोण मारी...! रस्त्यावर धावणाऱ्या लेकराला मृत्यू चाटून गेला, एक सेकंदाचा उशीर आणि...
लहान मुलाचा रस्त्यावरील खतरनाक व्हायरल व्हिडीओ
| Updated on: Feb 22, 2022 | 10:24 AM
Share

मुंबई : असं म्हणतात ना…मुले ही देवा घरीची फुले असतात आणि देव स्वत: मुलांचे रक्षण करत असतात. याचा एक प्रत्यय आला आहे. जेव्हा एका लहान मुलाचा मृत्यू (Death) त्याच्या अगदी जवळ आला आणि त्याला स्पर्श करून निघून गेला. सध्या सोशल मीडियावर एक खतरनाक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Terrifying video)  होताना दिसत आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. एक रस्ता (Road) आहे आणि वाहने ये-जा करत आहेत. एक लहान मुलगा रस्त्याच्या बाजूला उभा आहे आणि अचानक असे काही घडते की, प्रत्येकाचा श्वास रोखला जातो.

अंगावर काटा आणणारा खतरनाक व्हिडीओ! 

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण बघू शकतो की, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. मोठी वाहने सतत रत्यावरून ये-जा करत आहेत. रस्त्यात्या बाजूला एक महिला गाडी घेऊन उभी आहे. त्याचदरम्यान कोणालाही काही कळण्याच्या आतामध्ये एक लहान मुलगा अचानक रस्त्याच्या दिशेने धावतो.

त्याचदरम्यान रस्त्यावरून मोठा ट्रक येतो. मात्र, या लहान मुलाला रस्त्याकडे जाताना बघितल्यानंतर एक व्यक्ती लगेचच त्या मुलाच्या मागे धावून येतो आणि ट्रक खाली तो मुलगा जाणार त्यावेळी तो त्याला उचलतो आणि त्या मुलाला जीवनदान देतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ बघितल्यानंतर प्रत्येकजण या व्यक्तीचे काैतुक करताना दिसतो आहे.

इथे पाहा तो अपघाताचा व्हायरल व्हिडीओ

Man’s quick thinking and prompt action saves kids life. from HumansBeingBros

लहान लेकराला वाचवणाऱ्या त्या व्यक्तीचे कौतुक

हा व्हिडिओ सोशल डिस्कशन फोरम Reddit वर u/handlewithcareme यावर शेअर केला गेला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एका व्यक्तीच्या सतर्कतेमुळे एका मुलाचे प्राण वाचले.’ हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेकडो यूजर्सनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रत्येकजण त्या व्यक्तीचे मनापासून कौतुक करत आहे. मात्र, काही युजर्सनी ट्रकचालकाचे कौतुकही केले आहे. ज्या वेगाने त्याने अचानक ब्रेक लावले तेही कौतुकास्पद असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या : 

‘माणसानं माणसाशी माणुसकीनं वागलं पाहिजे’, ‘हे’ तीन मित्र कसा देतायत संदेश? पाहा Video

Kabristan wala restaurant : भारतातलं एक अजब रेस्टॉरंट, कुठे आहे? काय खास? पाहा ‘हा’ Viral video

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.