अय्या हा ड्रेस रंग बदलतोय! किती छान, 2 रंगांचा ड्रेस…Wow!

सूर्यप्रकाशात आपला रंग बदलणारे असे अनेक किडे, झाडं आणि फुलं तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहिली असतील. पण सूर्यप्रकाशात येताच ज्याचा रंग बदलतो, असा ड्रेस तुम्ही कधी पाहिला आहे का?

अय्या हा ड्रेस रंग बदलतोय! किती छान, 2 रंगांचा ड्रेस...Wow!
white gown changes into pink gown
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 28, 2022 | 6:17 PM

सोशल मीडिया हे आजच्या काळात एक मोठं प्लॅटफॉर्म आहे, जिथे आपल्याला विविध गोष्टी पाहायला, ऐकायला आणि वाचायला मिळतात. अनेक वेळा त्यांना पाहून आपण हसतो, तर अनेक वेळा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. ज्यानंतर आपण आश्चर्यचकित होतो आणि आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हा व्हिडीओ बघा तुम्हाला जो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.

सूर्यप्रकाशात आपला रंग बदलणारे असे अनेक किडे, झाडं आणि फुलं तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहिली असतील. पण सूर्यप्रकाशात येताच ज्याचा रंग बदलतो, असा ड्रेस तुम्ही कधी पाहिला आहे का?

जर तुम्हाला असे वाटत असेल की आम्ही त्या कपड्यांबद्दल बोलत आहोत..ज्यांचे धुताना ज्यांचे रंग निघतात, मग तुम्ही चुकताय कारण अशा पेहरावाची चर्चा इथे होत नाहीये. हे कपडे तर सूर्यप्रकाशात आले की रंग बदलतायत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेने पांढरा ड्रेस घातला आहे आणि ती लोकांना सांगत आहे की, उन्हात जाताच तिच्या ड्रेसचा रंग बदलतो.

हे पाहिल्यानंतर तुम्हाला काही क्षण नक्कीच वाटेल की बाईने आपल्या ड्रेसवर काहीतरी केलं असेल, पण बाई पुन्हा सावलीत आल्याबरोबर ड्रेस पांढरा होतो.

विज्ञानाची वाटचाल किती वेगाने होत आहे आणि जगात कोणत्या प्रकारच्या नव्या गोष्टींचा शोध लावला जात आहे, हे हा व्हिडिओ पाहून लक्षात येईल.

हा व्हिडिओ @izzipoopi नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जी स्वतः फॅशन इन्फ्लुएन्सर आहे. या व्हिडिओला 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

22 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. यासोबतच लोक या व्हिडिओवर कमेंट करत आपला फीडबॅक देत आहेत.