VIDEO | या जर्मन महिलेला बॉलिवूड गाण्याचं वेड, साडी नेसून शेतात कंगनाच्या गाण्यावर केला डान्स, पाहा व्हिडीओ

तुम्ही एकदा व्हिडीओ पाहिल्यानंतर पुन्हा-पुन्हा पाहणार असा व्हिडीओ आहे. जर्मन महिलेच्या अकाऊंटवरती रोज हजारोंच्या संख्येने वाढ होत आहे.

VIDEO | या जर्मन महिलेला बॉलिवूड गाण्याचं वेड, साडी नेसून शेतात कंगनाच्या गाण्यावर केला डान्स, पाहा व्हिडीओ
जर्मन महिलेचा व्हायरल डान्स
Image Credit source: twitter
| Updated on: Jan 23, 2023 | 2:37 PM

मुंबई : बॉलीवुड काही गाणी (bollywood song) देशात आणि परदेशातही अधिक आवडीने पाहिली जातात आणि ऐकली सुध्दा जातात. एका जर्मन महिलेचा (german woman) एक व्हिडीओ (Viral VIDEO) सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या जर्मन डान्सरचे लोकं अधिक व्हिडीओ पाहतात. त्या डान्स करणाऱ्या तरुणीचं नावं नीना आहे. कंगना रनौतचा चित्रपट क्वीन त्यातील एका गाण्यावर नीनाने डान्स केला आहे. तिचा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. त्याचबरोबर लोकांनी कमेंट करुन डान्सचं कौतुक केलं आहे.


इंस्टाग्रामवरती शेअर झालेल्या व्हिडीओमध्ये जर्मन तरुणीने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्याचबरोबर ती जोरदार डान्स करीत आहे. हा डान्स पाहिल्यानंतर अनेकांनी आवडला असल्याचं सांगितलं आहे. तुम्ही एकदा व्हिडीओ पाहिल्यानंतर पुन्हा-पुन्हा पाहणार असा व्हिडीओ आहे. जर्मन महिलेच्या अकाऊंटवरती रोज हजारोंच्या संख्येने वाढ होत आहे.