भयानक! 5 सेकंद जरी उशीर झाला असता तर? सत्य घटना…

एक एक सेकंद "आयुष्य" असू शकतो. माणूस एखाद्या सेकंदाने सुद्धा आपला जीव वाचवू शकतो हे आपल्याला हा व्हिडीओ बघून कळतं .

भयानक! 5 सेकंद जरी उशीर झाला असता तर? सत्य घटना...
Dangerous Video
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 22, 2022 | 11:27 AM

पिलीभीत, उत्तर प्रदेश: कधी कुठे जाताना वाघ आडवा आलाय का? अचानक? विचार करवत नाही ना? भयानक आहे हे…आपण आपल्याच नादात जात राहायचं आणि अचानक एखादा प्राणी आडवा येणार. आपलं डोकं बंद पडेल. अशा वेळी प्रत्येक सेकंद आपल्यासाठी महत्त्वाचा असतो, एक एक सेकंद “आयुष्य” असू शकतो. माणूस एखाद्या सेकंदाने सुद्धा आपला जीव वाचवू शकतो हे आपल्याला हा व्हिडीओ बघून कळतं .

उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये एक दुचाकीस्वार वाघाच्या हल्ल्यातून बचावला. सुदैवाने वाघानेही वेग दाखवला नाही आणि हे लोक थोडक्यात बचावले.

बाइकस्वाराला 5 सेकंदही उशीर झाला तर त्याचं डोकं वाघाच्या जबड्यात असायचं. दुचाकीस्वाराने कशीबशी दुचाकी मागे ढकलली आणि वाघानेही त्यांच्याकडे पाहिले आणि रस्त्यावरून जंगलाच्या दिशेने निघाला.

या दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात सर्व काही रेकॉर्ड केलं. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

प्रत्यक्षात पिलीभीत व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून अनेक रस्ते उदयाला आले आहेत. जंगलात जाताना वाहने सावकाश चालवावीत, असा नियम आहे, कारण या जंगलात जनावरे रस्त्यावर येऊन रस्ता ओलांडतात.

कार चालकाने आधीच आपली गाडी थांबवली होती, त्याचा मोबाईल काढला होता आणि तो आपल्या कॅमेऱ्याने रेकॉर्ड करायला सुरुवात केली होती. इतक्यात पाठीमागून एक दुचाकीस्वार आला, ज्याच्या मागे आणखी एक जण बसला होता.

दोघेही पटकन वाघाच्या जवळ पोहोचले आणि पटकन त्यांनी बाइक मागे घेतली. सुदैवाने वाघाला कळलं नाही,.