VIDEO : दोन जिराफ आमनेसामने, अशी लढाई तुम्ही कधीच बघितली नसेल, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर सध्या दोन जिराफांमधील लढाईचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. आम्ही आज तुम्हाला तो व्हिडीओ दाखवणार आहोत (two giraffes fight with each other video viral).

VIDEO : दोन जिराफ आमनेसामने, अशी लढाई तुम्ही कधीच बघितली नसेल, पाहा व्हिडीओ

मुंबई : दोन वाघांमधील मारामारी आपण कधी बघितली असेल. खेड्या गावात दोन म्हशींमधील, रेड्यांमधील किंवा कुत्र्यांमधील लढाई आपण बघितली असेल. पण जिराफची आपापसातील लढाई आपण कधीच बघितली नसेल. अनेकांनी तर प्रत्यक्षात जिराफ देखील बघितला नसेल. जिराफ त्याच्या लांब मानेमुळ सर्वांचे लक्ष वेधून घेतो. जिराफ हा शांत प्राणी आहे, असं म्हणतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर दोन जिराफांमधील लढाईचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. आम्ही आज तुम्हाला तो व्हिडीओ दाखवणार आहोत (two giraffes fight with each other video viral).

व्हिडीओत नेमकं काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दोन जिराफ आमनेसामने आल्याचं बघायला मिळत आहे. दोघांमध्ये जबरदस्त लढाई सुरु आहे. हे जिराफ एकमेकांना मानेने मारहाण करत आहेत. सुरुवातीला एक जिराफ शेजारी असलेल्या जिराफला मानेने मारण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरा जिराफ त्यापासून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर दुसरा देखील गर्रागर मान फिरवत बाजूच्या जिराफवर मानेने हल्ला करतो. दोघांमध्ये काही वेळ ही लढाई सुरुच राहते.

या व्हिडीओला Life and Nature या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आलं आहे. हा व्हिडीओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘दोन जिराफमधील दुर्मिळ लढाई’, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे अनेकजण या व्हिडीओवर प्रतिक्रिया देखील देत आहेत (two giraffes fight with each other video viral).

हेही वाचा : पगार वाढ पण हातात कमी येणार? केंद्राच्या नव्या PF नियमानं गोची निश्चित!

Published On - 2:46 pm, Wed, 24 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI