AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Live Debate Show दरम्यान कार्यकर्ते भिडले, व्हिडीओ व्हायरल!

@gharkekalesh नावाच्या आयडीसह हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आलाय. एक मिनिट 8 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडीओ खूप लोकांनी पाहिलाय. तर बरेच लोक हा व्हिडीओ लाईक सुद्धा करत आहेत. डिबेट शो तुम्ही खूप पाहिले असतील पण या दरम्यान कार्यकर्ते चिडून एकमेकांत भिडतील असं क्वचितच पाहिलं असेल. हा व्हायरल व्हिडीओ बघा, खूप हसाल

Live Debate Show दरम्यान कार्यकर्ते भिडले, व्हिडीओ व्हायरल!
live debate pakistan viralImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 29, 2023 | 1:00 PM
Share

इस्लामाबाद: सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ इतके मजेदार असतात की लोकांना ते आवडले की लोक ते इतरांना सुद्धा पाठवतात. विरंगुळा म्हणून आजकाल हे व्हिडीओ बघितले जातात. यात अनेक प्रकार असतात. कधी कुणी गाणं म्हणताना व्हिडीओ व्हायरल होतो. कधी कुणाचा डान्स व्हायरल होतो. कधी प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी लहान मुलांचे. व्हिडीओचे अनेक प्रकार त्यात प्लॅटफॉर्म्सचे सुद्धा अनेक प्रकार. सोशल मीडिया हा जणू काही समुद्रच आहे. हा समुद्र सगळ्यांसाठी सारखाच आहे. या समुद्रात अनेक देश, अनेक लोक आहेत. आता बघा ना पाकिस्तानचा व्हिडीओ व्हायरल होतोय. तिकडे लाईव्ह टीव्हीवर दोन लोकांमध्ये वाद झाला आणि आता हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतोय.

लाईव्ह डिबेट

टीव्हीवर बातम्यांच्या चॅनलवर तुम्ही लाईव्ह डिबेट पाहिलीच असेल. पाकिस्तानात एका लाईव्ह डिबेट दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय. दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये डिबेट सुरु होती आणि प्रकरण इतकं वाढलं की त्यांनी मारामारीच सुरु केली. हा व्हिडीओ बघून लोकं खूप हसतायत. टीव्हीवर एखाद्या विषयावर चर्चा सुरु असताना, वादविवाद सुरु असताना वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांचा अपमान करतात त्यांच्यात शाब्दिक चकमक होते हे तर आपण नेहमीच पाहत आलोय. पण कधी यावरून मारामारी झालेली पाहिलीये का? ती सुद्धा लाईव्ह! मग हा व्हिडीओ बघा…

आपसांत मारामाऱ्या

या व्हिडीओ मध्ये एक कार्यकर्ता इम्रान खानवर टीका करतोय तर दुसरा त्याचा बचाव करतोय. टीका करणारा म्हणतो, “इम्रान खान कसाई आहे”, दुसरा या वाक्यावर भडकतो. हा वाद इतका वाढतो की कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही की आपण टीव्हीवर दिसतोय. वाद टोकाला जातात आणि तिथे अँकर उपस्थित असताना, लाईव्ह शो मध्ये कार्यकर्ते आपसांत मारामाऱ्या करतात. हा व्हिडीओ बघून तुम्हाला खूप हसू येईल. तुम्ही आजवर असे अनेक लाईव्ह डिबेट शो पाहिले असतील पण क्वचितच असं दृश्य पाहिलं असेल.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.