AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : ‘…तर जग खूप वेगळं असतं’, असं काय म्हणून गेली आणि Troll झाली ‘ही’ American actress?

Russia Ukraine War : अमेरिकन अभिनेत्री (American actress) अॅनालिन मॅककॉर्डनेही (AnnaLynne McCord) हल्ले थांबवून रशियाला शांततेचे आवाहन केले आहे. मात्र, तिच्या व्हिडिओमध्ये ती असे काही बोलली, की लोकांनी तिला ट्रोल (Troll) करण्यास सुरुवात केली.

Viral : '...तर जग खूप वेगळं असतं', असं काय म्हणून गेली आणि Troll झाली 'ही' American actress?
अमेरिकन अभिनेत्री अॅनालिन मॅककॉर्ड
| Updated on: Feb 25, 2022 | 1:25 PM
Share

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनच्या शहरांवर बॉम्बफेक करत आहे. दरम्यान, जगभरातून लोक शांततेचे आवाहन केले जात आहे. हे युद्ध लवकर संपावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. या माध्यमातून विविध व्हिडिओ समोर येत आहेत. काही अत्यंत धक्कादायक आहेत. कारण यात सैनिक, नागरिक जखमी झाल्याचेही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही भावनिक व्हिडिओही आहेत. आता यातच अमेरिकन अभिनेत्री (American actress) अॅनालिन मॅककॉर्डनेही (AnnaLynne McCord) सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ले थांबवून रशियाला शांततेचे आवाहन केले आहे. मात्र, तिच्या व्हिडिओमध्ये ती असे काही बोलली, की लोकांनी तिला ट्रोल (Troll) करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची आई होण्याची इच्छा एका कवितेतून व्यक्त केली होती. त्यानंतर लोकांनी तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली.

सोशल मीडियावर खिल्ली

2 मिनिट 20 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 34 वर्षीय अभिनेत्री अॅनालिन मॅककॉर्ड कवितेच्या माध्यमातून ‘प्रिय राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन. मी तुझी आई नाही याचे मला खूप वाईट वाटते. जर मी तुझी आई असते तर मी तुझ्यावर खूप प्रेम केले असते. यासोबतच या अभिनेत्रीने पुतीनला वाढवले ​​असते तर त्यांचे आयुष्य कसे वेगळे झाले असते, असेही व्हिडिओमध्ये सांगितले आहे. अभिनेत्रीच्या या कवितेसाठी तिची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. यूझर्स तिला खूप ट्रोल करत आहेत.

प्राणही दिला असता…

व्हिडिओमध्ये अभिनेत्री अॅनालिन मॅककॉर्डने म्हटले आहे, कीजर मी तुझी आई असते, जर जग वेगळे असते, तर मी तुला सुरक्षित ठेवण्यासाठी मेले असते. तुझ्यासाठी मी माझा प्राण अर्पण केला असता. अभिनेत्री पुढे म्हणते, रशियन नेत्याची (पुतिन) आई होण्यासाठी माझा जन्म खूप उशीरा झाला यावर माझा विश्वास बसत नाही.

आणखी वाचा :

Eagle Attack Fox : Video पाहून यूझर्स म्हणतायत, पुतीन यांच्याबाबतीतही असंच होणार!

Russia Ukraine | व्लादिमीर पुतिन हे रशियन जेम्स बाँड आहेत की रशियाचे रजनीकांत? Viral होत आहेत भन्नाट Jokes

Russia Ukraine तणावात असताना सोशल मीडिया यूझर्सचं सुरूय भलतच काहीतरी…; युद्धावरही आलाय Memesचा महापूर!

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.