VIDEO : जिममध्ये खतरनाक स्टंट करतानाचा तरूणाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले वेडा आहे तो!

तंदुरूस्त आणि निरोगी राहण्यासाठी आपण जिममध्ये (Gym) जातो. त्यामध्येही सध्याच्या तरूणाईमध्ये जिममध्ये जाऊ फोटो आणि व्हिडीओ काढण्याचे क्रेझ अधिक आहे. सोशल मीडियावर जिममधील अनेक व्हिडीओ (Video) व्हायरल होतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही व्हिडीओ इतके जास्त खतरनाक असतात की, फेमस होण्यासाठी ते काहीतरी विचित्र पध्दतीने जिममध्ये व्यायाम करतात.

VIDEO : जिममध्ये खतरनाक स्टंट करतानाचा तरूणाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले वेडा आहे तो!
तरूणाचा जिममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 13, 2022 | 2:31 PM

मुंबई : तंदुरूस्त आणि निरोगी राहण्यासाठी आपण जिममध्ये (Gym) जातो. त्यामध्येही सध्याच्या तरूणाईमध्ये जिममध्ये जाऊ फोटो आणि व्हिडीओ काढण्याचे क्रेझ अधिक आहे. सोशल मीडियावर जिममधील अनेक व्हिडीओ (Video) व्हायरल होतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही व्हिडीओ इतके जास्त खतरनाक असतात की, फेमस होण्यासाठी ते काहीतरी विचित्र पध्दतीने जिममध्ये व्यायाम करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. एक तरूण (Young) जिममध्ये असे काहीतरी करतो की, ते पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतात.

तरूणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जिममध्ये चिनअप्स करताना दिसत आहे. पण त्यासाठी तो जे काही करतो ते पाहून तुम्हीही नक्की थक्क व्हाल. वेट घेऊन चिनअप्स करण्यासाठी तो कंबरेला काहीतरी वजनदार वस्तू बांधतो. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीची आक्रमकता स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे, परंतु बहुतेक लोकांना त्या व्यक्तीचा व्यायाम आवडला नाही. युजरने कमेंट करत म्हटले आहे की, कोणत्या जिममध्ये अशा प्रकारच्या मूर्खपणाची परवानगी आहे? असे म्हणत अनेकांनी संताप व्यक्त केला.

तरूणाचा जिममधील व्हिडीओ येथे पाहा

ट्विटरवर या व्यक्तीचा जिममधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, अरे भाऊ, असे करणे आवश्यक होते का? 8 सेकंदाच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. एक दिवसापूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ 21 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर 9 हजारांहून अधिक लोकांनी यावर आपला कमेंट केल्या आहेत. बहुतेक लोकांना या व्यक्तीची व्यायामाची पध्दत अजिबात आवडलेली दिसत नाहीये.

संबंधित बातम्या :

VIDEO : कलिंगड विक्रेत्याचा हटके व्हिडीओ पाहा आणि पोट धरून हसा!

VIDEO: माकड आणि मांजराची अशी अनोखी मैत्री तुम्ही कधीही पाहिली नसेल, पाहा खास व्हिडीओ!