मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी काय फेमस होईल हे सांगता येत नाही. सोशल मिडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील असे काही व्हिडीओ असतात, की ते बघितल्यानंतर आपण हसू आवरू शकत नाहीत. सध्या असाच एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये एक कलिंगड विक्रेता आहे. मात्र, या कलिंगड विक्रेत्याची खास कलिंगड विकण्याची पध्दत बघितल्यानंतर कोणीच आपले हसू आवरू शकणार नाही. कलिंगड (Watermelon) विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती हातगाडीवर कलिंगड विकत आहे. ज्या पद्धतीने तो कलिंगड विकत आहे, ते पाहून लोकांना हासू आवरत नाहीये. व्हिडिओ पाहून तुम्हाला वाटेल की, या माणसाला गाणे गाऊन कलिंगड विकायचे आहे, पण तो काय गातोय हे सांगणे अतिशय कठिण काम आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेव्हा कलिंगड विकणारा गाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मुले आणि समोरून जाणारे लोक त्याच्यावर हसतात. इतकंच नाही तर शेजारी उभी असलेली व्यक्तीही स्वतःला रोखू शकत नाही आणि हसते.
View this post on Instagram
व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 5 हजार लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून बहुतेक युजर्स हसत आहेत. यावर एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की हे भाऊ कच्च्या बदामाचे दुसरे व्हर्जन आहे. त्याचवेळी दुसर्या युजर्सने लिहिले की, जर हा माणूस खूप मोठा व्यावसायिक असता तर त्याच्या या शैलीने खूप जास्त मोठा झाला असता.
संबंधित बातम्या :
चुकीची रत्न देऊ शकतात आयुष्यभराच्या वेदना, जाणून घ्या रंजक माहिती