चुकीची रत्न देऊ शकतात आयुष्यभराच्या वेदना, जाणून घ्या रंजक माहिती

जीवनातील (Life) संकटांपासून मुक्ती मिळण्यासाठी, संपत्ती मिळविण्यासाठी, करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी, चांगले संबंध निर्माण करण्यासाठी, आरोग्य मिळण्यासाठी रत्न (Gems) धारण केले जातात. पण रत्न धारण करताना झालेल्या चुकीमुळे मोठे नुकसानही होऊ शकते.

चुकीची रत्न देऊ शकतात आयुष्यभराच्या वेदना, जाणून घ्या रंजक माहिती
agate-gemstone
मृणाल पाटील

|

Apr 13, 2022 | 7:00 AM

मुंबई : जीवनातील (Life) संकटांपासून मुक्ती मिळण्यासाठी, संपत्ती मिळविण्यासाठी, करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी, चांगले संबंध निर्माण करण्यासाठी, आरोग्य मिळण्यासाठी रत्न (Gems) धारण केले जातात. पण रत्न धारण करताना झालेल्या चुकीमुळे मोठे नुकसानही होऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्य बलवान आणि शुभ फल देणारा असेल तर त्याला घरात आणि बाहेर सर्वत्र मान-सन्मान मिळतो. त्याची सर्व कामे सहज होतात. ती व्यक्ती पराक्रमी मानली जाते.पण जर सूर्य अशक्त असेल तर हे सर्व सुख कमी होते. सूर्य (Sun)अशुभ असताना व्यक्ती अहंकारी होतो. अशा व्यक्तीच्या नकावर नेहमी राग असतो. यावर उपाय म्हणून माणिक रत्न वापरले जाते. त्याला सूर्यकांत मणी असेही म्हणतात. रुबी स्टोन धारण केल्याने कीर्ती आणि संपत्ती वाढते. माणिक दगड मेष राशीत जन्मलेल्या लोकांसाठी मुलांचा आणि शिक्षणाचा कारक सिद्ध होतो, तर सिंह राशीत जन्मलेल्या लोकांची जीवनशक्ती आणि आयुष्य वाढते, तर धनु राशीत जन्मलेल्या लोकांसाठी नशिबाचे दरवाजे उघडतात. अशी मान्याता आहे.

रत्नशास्त्रानुसार प्रत्येक रत्न कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे आणि रत्न धारण केल्याने संबंधित ग्रह मजबूत होऊन शुभ परिणाम देऊ लागतात. यामुळे व्यक्तीला त्या ग्रहाशी संबंधित जीवनक्षेत्रात फायदा होतो, त्याच्या समस्या दूर होतात. पण रत्न धारण करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा ते रत्न लाभाऐवजी नुकसान देऊ लागते. अशी परिस्थिती जीवनाला अनेक संकटांनी घेरू शकते. त्यामुळे रत्न धारण करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत.

रत्न धारण करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  1. रत्न धारण करण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या. कुंडलीतील ग्रहस्थिती लक्षात घेऊन रत्न नेहमी धारण करावे.
  2. कपटाने कोणाकडून घेतलेले रत्न कधीही घालू नका. असे रत्न शुभ परिणामांऐवजी अशुभ फल देईल.
  3. चोरीचे रत्न धारण करणे म्हणजे तुमच्या आयुष्यात संकटांना आमंत्रण देणे होय. अशी चूक कधीही करू नका.
  4. नेहमी कायद्यानुसार रत्ने परिधान करा, अन्यथा अत्यंत मौल्यवान रत्नेही कुचकामी ठरतील.
  5. अंगठी, ब्रेसलेट किंवा पेंडंटमध्ये घातलेले रत्न बाहेर पडले तर ते पुन्हा घालण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. कधी कधी असे रत्न पुन्हा धारण केल्याने नुकसान होऊ शकते.

माणिक रत्नाचे लाभ:

सूर्य ग्रहाचा रत्न माणिक खूपच चमकदार घट्ट लाल व गुलाबी रंगाचा असतो.
डोळ्यांबाबत त्रास होत असतील तर हा रत्न धारण करावा.
या रत्नाच्या प्रभावा मुळे प्रेमाच्या भावना जागृत होतात व व्यक्तित नेतृत्व करण्याचे गुण उत्पन्न होतात.
सरकारी क्षेत्रात काम करत असणाऱ्या लोकांसाठी हा रत्न खूप लाभकारी असतो.
कामकाजात लाभ आणि आपल्या प्रगति साठी हा रत्न धारण केला जातो.
आजारामुळे त्रास होत असतील व त्या पासून सुटका पाहिजे असेल तर हा रत्न अवश्य धारण करावा.

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Mercury transit | पुढील 24 तासात बदलणार तुमचे नशीब, या 3 राशींसाठी येणार सुखाचा काळ


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें