Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!
मनी प्लांट घरामध्ये लावणे फायदेशीर
Image Credit source: TV9

घरात असलेली झाडे (Plants) घराचे सौंदर्य वाढवण्याचे आणि हवा शुद्ध करण्याचे काम करतात. रिफ्रेशिंग मनी प्लांटला गोल्डन पोथोस असेही म्हणतात. हे एक लोकप्रिय घरगुती वनस्पती आहे. त्यामुळे हवा शुद्ध होते. त्यामुळे घरातील वातावरण स्वच्छ व सुंदर राहते. बाटली किंवा मातीच्या डब्यात मनी प्लांट (Money Plant) लावू शकता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 13, 2022 | 2:39 PM

मुंबई : घरात असलेली झाडे (Plants) घराचे सौंदर्य वाढवण्याचे आणि हवा शुद्ध करण्याचे काम करतात. रिफ्रेशिंग मनी प्लांटला गोल्डन पोथोस असेही म्हणतात. हे एक लोकप्रिय घरगुती वनस्पती आहे. त्यामुळे हवा शुद्ध होते. त्यामुळे घरातील वातावरण स्वच्छ व सुंदर राहते. बाटली किंवा मातीच्या डब्यात मनी प्लांट (Money Plant) लावू शकता. वास्तू आणि फेंगशुईनुसार मनी प्लांट घरासाठी लकी प्लांट मानला जातो. विशेष म्हणजे या मनी प्लांटला अत्यंत कमी सुर्यप्रकाश (Sunlight) लागतो. यामुळे घरामध्ये कुठेही मनी प्लांट लावता येतो. चला तर जाणून घेऊयात घरामध्ये मनी प्लांट लावण्याचे फायदे नेमके कोणते होतात.

हवा शुद्ध करते- मनी प्लांट कार्बन मोनोऑक्साइड सारखे विषारी वायू काढून शुद्ध ऑक्सिजन देते. त्यामुळे घरातील हवा शुद्ध होते. यामुळे नेहमीच घरामध्ये मनी प्लांट लावा.

तणाव आणि चिंता कमी होते- मनी प्लांट घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे घरातील तणाव कमी होतो. यामुळे चिंता आणि झोपेच्या समस्या दूर होतात.

संबंध सुधारते- मनी प्लांटची पाने हृदयाच्या आकाराची असतात. त्यामुळे कुटुंबात प्रेम आणि आनंद येतो. तुटलेली नाती दुरुस्त करण्यातही मदत होते. घरातील कुटुंबातील सदस्यांमधील संबंध सुधारतात.

अँटी-रेडिएटर म्हणून काम करते- मनी प्लांट्स आपल्या घरांमध्ये आणि ऑफिसमध्ये अँटी-रेडिएटर म्हणून काम करतात. संगणक, मोबाईल फोन आणि लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून निघणारे हानिकारक किरण शोषून घेतात.

वैवाहिक समस्या दूर ठेवतात- वास्तूनुसार मनी प्लांट घराच्या आत दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावा. यामुळे घरात शांतता आणि निरोगी वातावरण राहते. यामुळे वैवाहिक समस्या दूर राहतात.

संबंधित बातम्या : 

Zodiac | आजचा रविवार ‘या’ 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!

ही रत्ने वापरा आणि संपूर्ण आयुष्यच बदलून टाका, जाणून घ्या ‘या’ खास रत्नांबद्दल!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें