AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: या चिमुरड्यांमधील निरागसपणा माणसांना खूप काही शिकवून जातो, व्हिडीओ पाहा जाणीव होईल!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन लहान मुले एकमेकांभोवती उभी आहेत, तेव्हाच हिरवा टी-शर्ट घातलेला मुलगा दुसऱ्याला पाहून आनंदाने उड्या मारताना दिसत आहे. दुसरीकडे, दुसरा मुलगा दोन पावले पुढे नाचतो आणि त्याला मिठी मारतो.

Video: या चिमुरड्यांमधील निरागसपणा माणसांना खूप काही शिकवून जातो, व्हिडीओ पाहा जाणीव होईल!
चिमुरड्यांचा व्हायरल व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 2:10 PM
Share

लहान मुलांच्या गोंडस कृत्यांचे आणि त्यांच्या खोडकरपणाचे मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. अनेक वेळा असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहिल्यानंतर आपला मूड चांगला होतो आणि काही व्हिडीओ आपले मन जिंकून घेतात, पण कधी कधी या मुलांचा निरागसपणा माणसाला आपल्याला खूप काही शिकवून जातो. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो पाहण्यात इतका गोंडस आहे की तुम्ही पाहतच राहाल. ( Viral child video who hug another child in market emotional moment which will teach a unique lesson)

मुलांचे हृदय अगदी स्वच्छ असतं, त्यांच्या विचारात कोणताही कमीपणा नसतो. समाजाने निर्माण केलेला गरीब-श्रीमंत, भेदभाव असे काहीही त्यांना समजत नाही. यामुळेच त्याचा साधेपणा नेहमीच नेटकऱ्यांची मनं जिंकतो. अलीकडच्या काळात समोर आलेला व्हिडिओ, ज्यामध्ये मुलांनी त्यांच्या निरागसतेने मानवाला अत्यंत महत्त्वाचे ज्ञान दिले, ज्याची समाजालाही नितांत गरज आहे. जर तुम्ही या मुलांसारखे माणूस बनलात तर निसर्गाने निर्माण केलेली ही पृथ्वी स्वर्गासारखी होईल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन लहान मुले एकमेकांभोवती उभी आहेत, तेव्हाच हिरवा टी-शर्ट घातलेला मुलगा दुसऱ्याला पाहून आनंदाने उड्या मारताना दिसत आहे. दुसरीकडे, दुसरा मुलगा दोन पावले पुढे नाचतो आणि त्याला मिठी मारतो. प्रत्युत्तरात, समोरच्या मुलानेही त्याला घट्ट मिठी मारली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही क्षणभर नक्कीच भावूक व्हाल.

हा व्हिडिओ पाहा

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडीओ एकमेकांसोबत शेअर करत आहेत. या व्हिडीओ मुलांचा निरागसपणा तुमचं मन भारावून टाकेल. व्हिडीओवर शेकडो कमेंट्स आल्या आहेत. एका युजरने लिहलं, लहानपण खरंच खूप भारी असतं, तर दुसऱ्याने लिहलं, या मुलांच्या कृतीतून त्यांच्या पालकांचे संस्कार दिसतात.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ kiansh_ayansh नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहा. 28 ऑक्टोंबरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता, या व्हिडीओला आतापर्यंत 20 लाखांहून अधिक व्हूव्ज मिळाले आहेत.

हेही पाहा:

दोन ओळींत लाख मोलाचा उपदेश, प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंकांच्या ट्वीटला मिळतेय नेटकऱ्यांची पसंती!

Viral Video | माकडांनी पहिल्यांदा मोबाईल पाहून असं काही केलं, तुम्हीही ते बघून आवाक व्हाल

 

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.