Video: मालकाने चेहऱ्याला साबण लावला, आणि कुत्र्याने पाणी बंद केलं, पाहा कुत्र्याच्या हुशारीचा भन्नाट व्हिडीओ!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस मोठ्या आनंदाने आंघोळ करत आहे आणि त्याचा कुत्रा टेबलावर आरामात उभा आहे आणि त्यावर पाणी ओतत आहे

Video: मालकाने चेहऱ्याला साबण लावला, आणि कुत्र्याने पाणी बंद केलं, पाहा कुत्र्याच्या हुशारीचा भन्नाट व्हिडीओ!
मालकाला अंघोळ घालणारा कुत्रा

जर जगातील सर्वात निष्ठावान प्राण्याबद्दल बोलायचं झालं, तर कुत्र्याचे पहिलं नाव येतं. हा प्राणी जितका त्याच्या मालकाशी एकनिष्ठ असतो, तितकाच तो बुद्धिमान असतो. यामुळेच हा प्राणी माणसांच्या अगदी जवळ आहे. सोशल मीडियावर कुत्र्यांचे व्हिडिओ यूजर्सना खूप आवडतात. हे व्हिडिओ कधीकधी मोहक असले तरी, यापैकी बरेच व्हिडिओ खूपच मजेदार असतात. अलीकडच्या काळात असाच एक व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. (Viral Dog Video in Which Man bath on field suddenly dog play game people will laugh)

आपल्या सर्वांना माहित आहे की, अनेकांना प्राणी पाळण्याची खूप आवड असते. खाण्यापिण्यापासून ते झोपेपर्यंत तो आपल्या पाळीव प्राण्याला आपल्यासोबत ठेवतात. पाळीव प्राणीही मालकावर खूप निष्ठा दाखवतात. पण, अनेकदा ते असे कृत्य करतात, ज्याला पाहून लोक हसतात किंवा आश्चर्यचकित होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल ‘हे कुत्रं खरंच खूपच हुशार आहे.’

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस मोठ्या आनंदाने आंघोळ करत आहे आणि त्याचा कुत्रा टेबलावर आरामात उभा आहे आणि त्यावर पाणी ओतत आहे, परंतु जेव्हा कुत्र्याने पाहिले की त्याच्या मालकाने त्याच्या डोळ्यात साबण लावला आहे. मग त्याने गेम केला, त्याने अचानक पाणी ओतणे बंद केले आणि त्यानंतर कुत्रा काय करतो, हे पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

हा व्हिडीओ पाहा

सोशल मीडियावर Dog Fun या कू पेजला लोक खूप पसंत करत आहेत. यावर अनेक युजर्सनी मजेशीर कमेंटही केल्या. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘भाऊ, इथे कुत्रा आपली हुशारी दाखवून खेळ दाखवून गेला. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, ‘आम्ही लहानपणी अशा प्रकारचा खोडसाळपणा करायचो.’ दुसऱ्या युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘कुत्र्याचं टायमिंग भन्नाट आहे.’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कूवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही पाहा:

Video: आई म्हणते सफरचंद खा, चिमुरडी म्हणते, मला समोसाच हवा, पाहा आई-मुलीचा गोड संवाद!

‘माणिके मागे हिते’वर भन्नाट बेली डान्स, तिन्ही डान्सरच्या कौशल्यावर नेटकरी घायाळ, पाहा Video

Published On - 11:43 am, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI